धक्कादायक! वर्षभर भावाच्या डेड बॉडीसोबत घरात राहिले तीन भाऊ-बहीण आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 04:15 PM2021-10-26T16:15:47+5:302021-10-26T16:16:13+5:30

US Crime News : तेच याप्रकरणी पोलिसांनी मुलांची आई आणि तिच्या बॉयफ्रेन्डची चौकशी केली. सुरूवातीला चौकशी केल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

US Crime News : Three children living in house with dead body of brother for a year police found human skeleton | धक्कादायक! वर्षभर भावाच्या डेड बॉडीसोबत घरात राहिले तीन भाऊ-बहीण आणि मग...

धक्कादायक! वर्षभर भावाच्या डेड बॉडीसोबत घरात राहिले तीन भाऊ-बहीण आणि मग...

Next

अमेरिकन ह्यूस्टनमध्ये (US Houston) तीन लहान मुलं आपल्या भावाच्या मृतदेहासोबत वर्षभर घरात राहिले. जेव्हा याबाबत त्यांनी पोलिसांना सांगितलं की, तर पोलिसही हैराण झाले. या तीन मुलांचं वय १५, १० आणि सात वर्ष आहे. पोलिसांना घराच्या आत एक मानवी सांगाडा ताब्यात घेतला आहे.

तेच याप्रकरणी पोलिसांनी मुलांची आई आणि तिच्या बॉयफ्रेन्डची चौकशी केली. सुरूवातीला चौकशी केल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

'द गार्डियन' नुसार, गेल्या रविवारी एका १५ वर्षीय मुलाने हॅरिस काउंटी शेरिफ ऑफिसला फोन केला आणि सांगितलं की, त्याचा ९ वर्षीय भाऊ एक वर्षाआधी मरण पावला आहे आणि मृतदेह घराच्या आतच आहे. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना १० वर्षाची एक मुलगी, सात वर्षाचा एक मुलगा आणि फोन करणारा १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा आढळून आला. हे सगळे घरात एकटेच होते.

दरम्यान पोलिसांना एका मुलाच्या सांगाड्याचे अवशेष सापडले. पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियाला सांगितले की, असं दिसतं की अवशेष बऱ्याच महिन्यांपासून तिथेच होते'. रात्री उशीरा मुलाची आई आणि तिच्या प्रियकराचा शोध घेतला गेला. त्यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 'मुलं फारच दयनीय परिस्थितीत राहत होते'. मुलांनी जे काही दाखवलं ते त्रासदायक आणि धक्कादायक होतं. घराच्या आत सांगाडा सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ते पुढे म्हणाले की, मुलं कुपोषित दिसत होत आणि त्यांच्या शरीरांवर जखमाही होत्या. तिघांनाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 
 

Web Title: US Crime News : Three children living in house with dead body of brother for a year police found human skeleton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.