स्टुडंटचं लैंगिक शोषण करत होती महिला टीचर, पतीच्या तक्रारीनंतर खातेय तुरूंगाची हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 04:45 PM2022-05-20T16:45:20+5:302022-05-20T16:46:22+5:30

Girl molested by woman teacher : पतीच्या सांगण्यावरून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली होती आणि चौकशीनंतर महिलेला पोलिसांनी अटक केली. २५ वर्षीय शिक्षिकेचं नाव ओलिविया ओर्ट्ज आहे.

US : Girl molested by woman teacher husband alerts police | स्टुडंटचं लैंगिक शोषण करत होती महिला टीचर, पतीच्या तक्रारीनंतर खातेय तुरूंगाची हवा

स्टुडंटचं लैंगिक शोषण करत होती महिला टीचर, पतीच्या तक्रारीनंतर खातेय तुरूंगाची हवा

Next

एका महिला टीचरवर आपल्याच शाळेतील एका विद्यार्थीनीचं लैंगिक शोषण (Girl molested by woman teacher) केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाची तक्रार दुसरं कुणी नाही तर स्वत: महिलेच्या पतीने दिली होती.

पतीच्या सांगण्यावरून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली होती आणि चौकशीनंतर महिलेला पोलिसांनी अटक केली. २५ वर्षीय शिक्षिकेचं नाव ओलिविया ओर्ट्ज आहे. ती अमेरिकेच्या पेंसिल्वेनियाची राहणारी आहे.

ओलिविया येथील एका स्थानिक शाळेत शिकवत होती. आरोप आहे की, यादरम्यान तिने हायस्कूलच्या एका १७ वर्षीय विद्यार्थीनीचं लैंगिक शोषण केलं. याची खबर ओलिवियाच्या पतीला तेव्हा लागली जेव्हा त्याने त्याच्या पत्नीचा आयपॅड चेक केला.

आयपॅंडमध्ये त्याला ओलिविया आणि विद्यार्थीनीचे मेसेजेस दिसले. ज्यानंतर पतीने आधी ओलिवियाच्या या कारनाम्याची माहिती शाळेच्या मुख्यध्यापकांना दिली. त्यांनी ओलिवियाला लगेच शाळेतून निलंबित केलं आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, गेल्याच आठवड्यात पोलिसांनी ओलिवियाला अटक केली. ओलिवियाला लॉरेन्स काउंटी तुरूंगात ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणाची सुनावणी २५ मे रोजी होणार आहे. विद्यार्थीनीने पोलिसांना सांगितलं की, जेव्हा महिलेचा पती घरी नव्हता तेव्हा ती अनेक तिच्या घरी गेली होती. महत्वाची बाब म्हणजे याच शाळेतील म्युझिक टीचरवर सुद्धा विद्यार्थीनीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. 

Web Title: US : Girl molested by woman teacher husband alerts police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.