प्रायव्हेट पार्टला बांधून घेऊन जात होता ड्रग्स, पोलिसांनी पकडलं तर दिलं अजब उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:20 PM2021-12-24T12:20:32+5:302021-12-24T12:21:40+5:30
३४ वर्षीय पेट्रिक फ्लोरेंस कारमधून जात होता. पोलिसांनी त्याला शनिवारी पकडलं. तो रस्त्यावर लाइट बंद करून कार चालवत होता.
ड्रग्सच्या तस्करीच्या अनेक विचित्र घटना नेहमीच समोर येत असतात. कुणी नकली केसांमध्ये तर कुणी अंडरगारमेंट्समध्ये लपून ड्रग्सची तस्करी करताना लोक पकडले जातात. पण एकाने फारच कमाल केली. अमेरिकेतील (America) फ्लोरिडामधून (Florida) पोलिसांना एकाला अटक केली. तो त्याच्या प्रायव्हेट पार्टला ड्रग्सची छोटी पुडी बांधून नेत होता. जेव्हा पोलिसांनी विचारलं की, हे ड्रग्स कुणाचं आहे तर तो म्हणाला की, हे ड्रग्स त्याचं नाहीये.
३४ वर्षीय पेट्रिक फ्लोरेंस कारमधून जात होता. पोलिसांनी त्याला शनिवारी पकडलं. तो रस्त्यावर लाइट बंद करून कार चालवत होता. त्यामुळे त्याला पोलिसांनी रोखलं आणि संशय आल्याने त्याची झडती घेतली. त्यानंतर जे दिसलं ते पाहून पोलिसही हैराण झाले.
WFLA नुसार, या ड्रायव्हरला पोलिसांनी गांजा आणि डीयूआय सोबत बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याची झडती घेत असताना पोलिसांना त्याच्याकडे पिस्तुलही सापडलं. ही पिस्तुल पॅसेंजर सीटखाली होती. त्याची झडती घेत असताना पोलिसांना त्याच्या प्रायव्हेट पार्टला बांधलेली पिशवी दिसली. ज्यात कोकेन आणि मॅथ होतं.
मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा फ्लोरेंसची चौकशी केली गेली तेव्हा त्याने सांगितलं की, जी वस्तू त्याच्या प्रायव्हेट पार्टला बांधलेली सापडलेली ती त्याची नाहीये. याआधीही पोलिसांनी फ्लोरेंसला २० वेळा ड्रग्स प्रकरणी अटक केली आहे. याआधी तो २४००० डॉलरच्या बॉन्डवर जामीनावर सुटला होता.