Colorado Firing : अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 11:03 AM2021-03-23T11:03:37+5:302021-03-23T11:09:55+5:30

Colorado Firing : कोलोराडोच्या बोल्डर परिसरातील एका सुपरमार्केटमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.

usa colorado supermarket firing police officer multiple people killed | Colorado Firing : अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू

Colorado Firing : अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू

googlenewsNext

अमेरिकेतील कोलोराडो प्रांतातील एका सुपरमार्केटमध्ये अज्ञात व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार (Colorado Firing) केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यामध्ये 10 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलोराडोच्या बोल्डर परिसरातील एका सुपरमार्केटमध्ये हा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. मात्र याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.

बोल्डर पोलीस विभागाचे प्रमुख कमांडर केरी यामागुची यांनी या घटनेविषयी माहिती दिली. तपास अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आहे. गोळाबार करण्यामागचा नेमका उद्देश काय होता याचा तपास सुरू आहे. घटनास्थळाची पाहणी केली जात असून, नक्की किती लोकांचा मृत्यू झाला आहे, हे अजून कळू शकलेलं नाही. या घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि दुःखद बाब म्हणजे मृतांमध्ये एक बोल्डरमधील पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे असं यामागुची यांनी सांगितलं. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुपरमार्केटमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकून लोक इतरत्र पळू लागले. तसेच अनेक जण खाली पडलेले दिसले. हा धक्कादायक प्रकार परिसरातील सीसीटीव्हमध्ये कैद झाला असून फुटेज व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये लोक रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. स्थानिक पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येत सुपरमार्केटच्या संपूर्ण परिसराला वेढा घातला. स्थानिक पोलिसांच्या मदतीला 3 हेलिकॉप्टर्सही देण्यात आली होती. गोळीबारात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: usa colorado supermarket firing police officer multiple people killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.