क्रूझ ड्रग्स पार्टीच्या इंव्हिटेशनसाठी इंस्टाग्रामचा वापर, 5 लाख रुपयांपर्यंत एंट्री फीस; बाकी डिटेल्स जाणून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 01:07 PM2021-10-03T13:07:00+5:302021-10-03T13:08:56+5:30

समुद्रात जेथे पोलिसांची भीती नसते, अशा ठिकाणी या ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी लोकांना आकर्षक किट भेट देऊनही इंव्हाइट करण्यात आले होते. 

Use of Instagram for Cruise Drugs Party Invitations, entry fees up to Rs 5 lakh; know the details | क्रूझ ड्रग्स पार्टीच्या इंव्हिटेशनसाठी इंस्टाग्रामचा वापर, 5 लाख रुपयांपर्यंत एंट्री फीस; बाकी डिटेल्स जाणून हैराण व्हाल

क्रूझ ड्रग्स पार्टीच्या इंव्हिटेशनसाठी इंस्टाग्रामचा वापर, 5 लाख रुपयांपर्यंत एंट्री फीस; बाकी डिटेल्स जाणून हैराण व्हाल

Next


मुंबई - मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझमध्ये ड्रग्स पार्टीदरम्यान रविवारी रात्री नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने छापेमारी करत एका मोठ्या अॅक्टरच्या मुलासह दहा जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांची चौकशी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, सहभागी लोकांनी त्यांच्या पँटच्या शिलाईमध्ये, महिलांच्या पर्सच्या हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईच्या भागामध्ये आणि कॉलरच्या शिलाईमध्ये ड्रग्स लपवून नेले होते. तथापि, NCB पुन्हा एकदा या सर्व माहितीचा तपास करत आहे आणि यासंदर्भात संबंधित लोकांची चौकशीही करत आहे. (Use of Instagram for Cruise Drugs Party Invitations, entry fees up to Rs 5 lakh; know the details)

या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? -
समुद्रात जेथे पोलिसांची भीती नसते, अशा ठिकाणी या ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे क्रूझवरील या ड्रग्स पार्टीची प्रवेश फीस 80 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली होती. या क्रूझची क्षमता सुमारे 2 हजार लोकांची आहे. मात्र, येथे 1 हजार पेक्षा कमी लोकच उपस्थित होते. या पार्टीसाठी इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून निमंत्रण देण्यात आले होते. यासाठी लोकांना आकर्षक किट भेट देऊनही इंव्हाइट करण्यात आले होते. 

क्रूझ पार्टीत सहभागी झालेले अधिकांश लोक दिल्लीचे -
या क्रूझ पार्टीत सहभागी झालेले अधिकांश लोक दिल्लीचे आहेत, ते विमानाने मुंबईला आले आणि नंतर क्रूझवर गेले. अरबाज नावाच्या व्यक्तीची एनसीबीकडून चौकशीही सुरू आहे. एनसीबीला तपासादरम्यान त्याच्या शूजमधून ड्रग्स सापडले. सूत्रांच्या माहितीनुसार, अरबाजनेच अभिनेत्याच्या मुलाला सोबत नेले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एनसीबीने अद्याप लोकांची नावे अधिकृतपणे उघड केलेली नाहीत.

क्रूझवर पकडण्यात आलेल्यांना परत मुंबईत आणण्यात आले आहे. आता पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल. NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या टीमने या क्रूझवरील हा छापा टाकला आहे.

Web Title: Use of Instagram for Cruise Drugs Party Invitations, entry fees up to Rs 5 lakh; know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.