नक्षलवादाशी सामना करण्यासाठी अत्याधुनिक गॅजेड्स वापरावे - प्रवीण दीक्षित, माजी डीजी

By पूनम अपराज | Published: May 3, 2019 08:29 PM2019-05-03T20:29:20+5:302019-05-03T20:31:21+5:30

कार्यकाळात सुदैवाने महाराष्ट्रात एकही नक्षलवादी हल्ला झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

To use the latest gadgets to deal with Naxalism - Pravin Dixit, former DG | नक्षलवादाशी सामना करण्यासाठी अत्याधुनिक गॅजेड्स वापरावे - प्रवीण दीक्षित, माजी डीजी

नक्षलवादाशी सामना करण्यासाठी अत्याधुनिक गॅजेड्स वापरावे - प्रवीण दीक्षित, माजी डीजी

Next
ठळक मुद्दे व्यवस्थित पेट्रोलिंग करत भूसुरुंगांची माहिती काढून गेलं पाहिजे. अत्याधुनिक तंत्राचा वापर करत पेट्रोलिंगसाठी मनुष्यबळाऐवजी गॅजेट्सचा आणि ड्रोनचा वापर करणं सोयीचं ठरू शकतं.

मुंबई - गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री महामार्गाच्या कामासाठी आणलेली 36 वाहनं जाळली. तसेच १ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास सीआरपीएफच्या क्युआरटी जवानांना घेऊन जाणाऱ्या गाड्या भूसुरुंग स्फोटात उडवल्या. यामध्ये १५ जवाना शहीद झाले आहेत तर १ वाहन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या चालकाला देखील शहिदाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, अशा नक्षलवाद्यांची मुस्काटदाबी करण्यासाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी काय - काय उपाययोजना करता येऊ शकतील हे लोकमतशी बोलताना सांगितलं. विशेषतः प्रवीण दीक्षित राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) म्हणून २०१५ ते २०१६ मध्ये कामकाज पाहत होते. या त्यांच्या कार्यकाळात सुदैवाने महाराष्ट्रात एकही नक्षलवादी हल्ला झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

१ मे रोजी झालेला नक्षलवादी हल्ला भ्याड हल्ला असून अशा नक्षलवादी हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वाहन चालकासह पोलिसांनी देखील ज्या ठिकाणी जायचं आहे. त्या ठिकाणची इत्यंभूत माहिती घेऊन आणि व्यवस्थित पेट्रोलिंग करत भूसुरुंगांची माहिती काढून गेलं पाहिजे. तसेच अत्याधुनिक तंत्राचा वापर करत पेट्रोलिंगसाठी मनुष्यबळाऐवजी गॅजेट्सचा आणि ड्रोनचा वापर करणं सोयीचं ठरू शकतं. ड्रोनद्वारे भूसुरुंगांची माहिती मिळू शकते असं पुढे दीक्षित यांनी सांगितलं. मी डीजी असताना गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांना भूसुरुंग डिटेक्ट करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होत. महत्वाचं म्हणजे तेथील स्थानिकांशी आम्ही पोलिसांसोबत सुसंवाद घडवून आणला होता. त्याची खूप आम्हाला मदत झाली होती. त्याचप्रमाणे नक्षलवादी जिल्ह्यातील कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजनांचा लाभ करून दिला होता अशी माहिती दीक्षित यांनी पुढे दिली. नंबला केशव राव उर्फ बसवराज हा या नक्षलवादी हल्ल्यामागे मास्टरमाईंड असल्याची शक्यता गडचिरोली पोलिसांनी वर्तवली आहे. 

अंबुज कॉल म्हणजे नेमकं काय ?

अंबुज कॉल हा नक्षलवाद्यांची मोडस ऑपरेंडी आहे. बहुतांश वेळा अंबुज कॉलद्वारे नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ले घडवून आणले आहेत.  अंबुज कॉल म्हणजे जिल्ह्यातील एखादा प्लांट, ट्रॅकर, गाड्या जाळपोळ करायचा. त्यानंतर नक्षलींना माहीतच असतं की पोलिसांचं पथक पंचनामा करण्यासाठी येणार. त्या अनुषंगाने सिव्हिल ड्रेसमधील सिव्हिलियन नक्षलवादी हा पोलिसांच्या पथकावर नजर ठेवून असतो. पोलीस जरी खाजगी वाहनातून आले. तरी बारीक लक्ष ठेवून असलेला सिव्हिलियन नक्षलवादी जंगलातील नक्षलवाद्यांना पथकबाबत माहिती देतो. त्यानुसार पोलिसांवर हल्ला घडवून आणला जातो. यालाच अंबुज कॉल म्हणतात. २००९ साली देखील मरकेगाव, हत्तीगोटा आणि लाहेरी येथे अंबुज कॉलद्वारे ५९ पोलीस शहीद झाले होते. या तिन्ही ठिकाणी स्टोन क्रशर आणि डांबराचे ट्रक जाळून, पंचनाम्याची आलेल्या पोलिसांच्या पथकाला नक्षलींनी टार्गेट केले होते. याचीच पुनरावृत्ती १ मे रोजी झाली. भूसुरुंग हे रस्त्याचे कामकाज सुरु असताना रस्त्याचे काम करणारे कामगार आरामासाठी गेले असताना नक्षली अंडर कन्स्ट्रक्शन रस्त्याखाली जिलेटीनचे पिंप रचले जातात. याबाबत तसूभर कल्पना कामगारांना नसते. नंतर संधी मिळेल तसा भूसुरुंग नक्षलवादी घडवून आणतात. तसेच मोठ्या नाल्यातही भूसुरुंग ठेवले जातात. 

Web Title: To use the latest gadgets to deal with Naxalism - Pravin Dixit, former DG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.