साताऱ्यातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या बनावट लेटर पॅडचा वापर, पोलिस अधिकाऱ्याची बदनामी

By दत्ता यादव | Published: August 24, 2023 04:21 PM2023-08-24T16:21:00+5:302023-08-24T16:21:41+5:30

याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Use of fake letter pads of dignitaries in Satara, defamation of police officer | साताऱ्यातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या बनावट लेटर पॅडचा वापर, पोलिस अधिकाऱ्याची बदनामी

साताऱ्यातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या बनावट लेटर पॅडचा वापर, पोलिस अधिकाऱ्याची बदनामी

googlenewsNext

सातारा : जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचा उपयोग करून त्यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची बदनामी केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस दक्षता पथक व जिल्हा जात पडताळणी कार्यालयातील पोलिस निरीक्षक नितीन माने (वय ४८) हे भ्रष्टाचाराला व बेकायदेशीर कामाला विरोध करीत आहेत. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने फाैजदारी पात्र कट रचून पोलिस निरीक्षक माने यांच्या लौकिकाला बाधा आणण्यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचे बनावट लेटर पॅड तयार केले. त्या लेटर पॅडवर संबंधित प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करून त्यामध्ये पोलिस निरीक्षक माने यांची बदनामी होईल व वरिष्ठांचे त्यांच्याबाबत मत दूषित होईल, असा मजकूर लिहिला. 

त्यानंतर ते पत्र पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयास पाठवले. मात्र, तपासाअंती हे लेटर पॅड बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अज्ञात व्यक्तीने माने यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने ते पत्र वरिष्ठांना पाठविल्याचे समोर आले. यानंतर माने यांनी संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कांकडकी हे करीत आहेत.

Web Title: Use of fake letter pads of dignitaries in Satara, defamation of police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.