रॉकेलचा काळाबाजार आणि जुगार अड्डयावर धाड; सहा जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 08:24 PM2018-11-30T20:24:20+5:302018-11-30T20:30:29+5:30

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून किराणा दुकानात बेकायदा रॉकेल विक्री होत होती.

Used for the sale of kerosene black market and gambling; Six people arrested | रॉकेलचा काळाबाजार आणि जुगार अड्डयावर धाड; सहा जणांना अटक 

रॉकेलचा काळाबाजार आणि जुगार अड्डयावर धाड; सहा जणांना अटक 

Next
ठळक मुद्देजुगार अडयासह दोन किराणा दुकानावर पोलिसांनी धाड टाकून 6 जणांना अटक केली.वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांच्या पोलीस पथकाने अड्ड्यावर धाड मारली आहेअड्डा चालविणारी महिलेसह देवानंद जग्यासी, सुनिल वासवानी, बंटी श्यामनानी, विनोद संतुमल रुपचंदानी, हरि साळवे यांना अटक

उल्हासनगर  - कॅम्प क्रमांक - २ परिसरातील फक्कड मंडली चौकातील जुगार अडयासह दोन किराणा दुकानावर पोलिसांनी धाड टाकून 6 जणांना अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून किराणा दुकानात बेकायदा रॉकेल विक्री होत होती.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक - 2 फक्कड मंडली येथे एका महिलेसह शंकर कुकरेजा व हरेश कुकरेजा हे दोघे भाऊ जुगाराचा अड्डा चालवित असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. तसेच कुकरेजा बंधूंच्या दुकानातून अवैधपणे रॉकेलची विक्री केली जात होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांच्या पोलीस पथकाने अड्ड्यावर धाड मारली आहे . तेव्हा हा अड्डा चालविणारी महिलेसह देवानंद जग्यासी, सुनिल वासवानी, बंटी श्यामनानी, विनोद संतुमल रुपचंदानी, हरि साळवे यांना अटक केली. दरम्यान शंकर कुकरेजा व त्याचा भाऊ हे  किराणा दुकानाच्या आड जुगार आणि रॉकेलचा काळाबाजार करत आहेत. यांच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल असताना त्यांना तडीपार केल पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Web Title: Used for the sale of kerosene black market and gambling; Six people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.