भिवंडीत युरियाचा अवैध साठा हस्तगत, दुधात भेसळ करण्यासाठी वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 02:08 AM2019-10-01T02:08:37+5:302019-10-01T02:08:46+5:30

पूर्णा येथील विमल कम्पाउंडमध्ये असलेल्या साई श्रद्धा एजन्सीच्या गोदामावर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी छापा टाकून सात टन युरिया खताचा अवैध साठा जप्त केला.

Utilization of illicit urea in stock, use of adulterated milk | भिवंडीत युरियाचा अवैध साठा हस्तगत, दुधात भेसळ करण्यासाठी वापर

भिवंडीत युरियाचा अवैध साठा हस्तगत, दुधात भेसळ करण्यासाठी वापर

Next

भिवंडी : पूर्णा येथील विमल कम्पाउंडमध्ये असलेल्या साई श्रद्धा एजन्सीच्या गोदामावर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी छापा टाकून सात टन युरिया खताचा अवैध साठा जप्त केला. याप्रकरणी गोदाम व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

पूर्णा येथील विलास दगडू पाटील, बेळगाव येथील ट्रकचालक जावेद हुसेनसाब मुल्ला आणि क्लीनर रमजान मुन्ना मुल्ला ही आरोपींची नावे आहेत. या तिघांनाही सोमवारी भिवंडीत न्यायालयाने ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. युरिया खतामध्ये भेसळ करणाऱ्या रॅकेटमध्ये गोदाममालक, चालक, खत उत्पादक, साठवणूक करणारा तसेच पुरवठादार आदींचा समावेश असल्याने या सर्वांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

भिवंडीतील पूर्णा येथील गोदामात औषधनिर्मिती व दूधभेसळीसाठी वापरण्यात येणाºया युरिया खताचा अवैध साठा केला जात असल्याची खबर अमली पदार्थविरोधी पथकास मिळाल्याने रविवारी सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला. त्यावेळी कर्नाटक येथून युरिया खत भरून आलेल्या ट्रकमधून गोदामात खताच्या गोण्या भरल्या जात असल्याचे दिसून आले. यावेळी गोदाम व्यवस्थापक विलास पाटील याच्याकडे युरिया खतसाठा परवान्याची चौकशी केली असता, त्यांच्याकडे परवाना नसल्याचे उघड झाले.

खतांच्या गोण्यांवर कोणताही बॅच क्रमांक अथवा निर्मिती तारीखदेखील नव्हती. त्यामुळे हे युरिया खत शेतकऱ्यांना न पुरवता, ते अन्यत्र भेसळीसाठी साठवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करून ट्रकसह युरिया खताच्या सात टन वजनाच्या १५१ गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाची व्याप्ती तपासली जात असल्याची माहिती एपीआय के.आर. पाटील यांनी दिली.

Web Title: Utilization of illicit urea in stock, use of adulterated milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.