Crime News: धर्मांतरण प्रकरणी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाचा नागपुरात छापा; तिघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 10:26 PM2021-07-17T22:26:43+5:302021-07-17T22:27:09+5:30

Crime News Nagpur: गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्या छोट्याछोट्या गरजा पूर्ण करून त्यांचे पद्धतशीर धर्मांतरण करून घेण्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये सुरू होता. एक मोठे रॅकेट त्यात गुंतले होते.

Uttar Pradesh Anti-Terrorism Squad raids Nagpur over cast conversion case | Crime News: धर्मांतरण प्रकरणी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाचा नागपुरात छापा; तिघांना घेतले ताब्यात

Crime News: धर्मांतरण प्रकरणी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाचा नागपुरात छापा; तिघांना घेतले ताब्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरगरिबांना वेगवेगळे आमिष दाखवून धर्मांतरण करून घेणाऱ्या रँकेटमधील तिघांना उत्तर प्रदेशच्या एटीएसने (दहशतवाद विरोधी पथक) शुक्रवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. काैसर आलम शाैकत अली खान, प्रसाद रामेश्वर कावरे आणि असल्लम मुस्तफा ऊर्फ भूप्रियबंदो देवीदास मानकर अशी या तिघांची नावे आहेत. ते गणेशपेठ परिसरात लपूनछपून वावरत होते. काैसर हा धनबाद, लोहिचारा (झारखंड) येथील, तर कावरे आणि मानकर नागपुरातील रहिवासी आहेत.

गोरगरिबांना पैशाचे आमिष दाखवून, त्यांच्या छोट्याछोट्या गरजा पूर्ण करून त्यांचे पद्धतशीर धर्मांतरण करून घेण्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये सुरू होता. एक मोठे रॅकेट त्यात गुंतले होते. गोमतीनगर पोलीस स्टेशनमध्ये धर्मांतर विरोधी कायद्याचा गुन्हा दाखल करून यूपी एटीएसने या रॅकेटचा भंडाफोड केला होता. रॅकेटमधील काहींना अटकही केली होती. त्यांच्याकडून जप्त केलेल्या कारवाईतून आणि मिळालेल्या माहितीवरून या रॅकेटमध्ये महाराष्ट्रासह केरळ, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथील एक हजार पेक्षा जास्त जणांची नावे आणि पत्ते एटीएसला मिळाले. त्याआधारे उत्तर प्रदेश पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई सुरू केली. या रॅकेटशी संबंधित काही जण नागपुरात लपून असल्याचे यूपी एटीएसला कळले. त्यामुळे एटीएसच्या पथकाने शुक्रवारी दुपारी नागपूर गाठले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन त्यांनी कारवाईसाठी मदत मागितली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहुल कॉम्प्लेक्समध्ये छापा घातला. येथे २०२ क्रमांकाच्या सदनिकेत लपून असलेल्या काैसर आलम, प्रसाद कावरे आणि असल्लम मुस्तफाला जेरबंद केले. त्यांच्याकडून काही महत्वाची कागदपत्रे आणि चिजवस्तूही जप्त करण्यात आल्या. त्यांना घेऊन एटीएसचे पथक शनिवारी उत्तर प्रदेशकडे रवाना झाले.

कारवाईबाबत गोपनीयता

या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. शनिवारी दुपारी ही कारवाई चर्चेला आल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत विस्तृत माहिती नसल्याचे सांगून यूपी एटीएसच्या गुन्ह्यात ते वॉन्टेड होते. त्यांना पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांनी मदत केल्याचे सांगितले.

मानकर ‘कन्व्हर्ट’, कावरे वाटेवर
मानकर आणि कावरे अनेक दिवस उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्याला होते. मानकरने धर्मांतरण केले तर कावरेने धर्मांतर करून घेतले असले तरी त्याने ते उघड केले नव्हते. कावरेेने स्वत:सोबतच कुटुंबातील दोन सदस्याचेही धर्मांतरण करून घेतल्याची माहिती आहे. नागपुरात त्याने सावज शोधण्याचे प्रयत्न चालविले होते, अशीही माहिती आहे.

Web Title: Uttar Pradesh Anti-Terrorism Squad raids Nagpur over cast conversion case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.