खळबळजनक! योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 01:09 PM2020-05-22T13:09:50+5:302020-05-22T13:17:07+5:30

हा मेसेज आल्यानंतर पोलीस दलात खळबळ माजली.

Uttar Pradesh chief minister Yogi Adityanath on Thursday midnight received a life threat message pda | खळबळजनक! योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

खळबळजनक! योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशच्या पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्स अ‍ॅप नंबर UP ११२ यावर  गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एक मेसेज आला. हा मेसेज 8828453350 या मोबाईल क्रमांकावरून आल्याचं पोलिसांना आढळलं

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी व्हॉट्स अ‍ॅपवर मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्स अ‍ॅप नंबर UP ११२ यावर  गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एक मेसेज आला. या मेसेजमध्ये, मी मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवून देणार आहे, ते समाजचे शत्रू आहेत असं लिहिलं होतं. हा मेसेज आल्यानंतर पोलीस दलात खळबळ माजली.


हा मेसेज 8828453350 या मोबाईल क्रमांकावरून आल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी संबंधित मोबाईल नंबरचे तपशील शोधायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे गोमती नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी धीरज कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी याबाबत तपास सुरु केला आहे. तसेच सायबर सेलच्या मदतीने या सायबर गुन्हेगाराचा तपास करणं सुरु आहे. 

 

Coronavirus : पोलीस दलाला कोरोनाचा वाढता विळखा, ठाण्यात महिला पोलिसाचा मृत्यू

 

विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न 

 

धक्कादायक! मुलाला 'क्राईम सिरीअल' दाखवत तयार केले; मातेने तिहेरी हत्याकांड घडवलं

 

लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे सुरु होते, तितक्यात पोलिसांची धाड पडली अन्...

Web Title: Uttar Pradesh chief minister Yogi Adityanath on Thursday midnight received a life threat message pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.