उत्तर प्रदेशात फिर्यादी महिलेसमक्ष गैरवर्तन करणाऱ्या फौजदारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 03:38 AM2020-07-03T03:38:46+5:302020-07-03T03:38:54+5:30
पहिल्या दोन वेळेस या महिलेने लज्जेपोटी त्याकडे दुर्लक्ष केले. तिसºया वेळीही भीष्मपाल यांनी तिला बोलावले तेव्हा ती गुपचूप व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याच्या तयारीने गेली
लखनौ : फिर्याद नोंदविण्यास आईसोबत पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेला स्वत:च्या समोर बसवून तिच्यासमक्ष तीन निरनिराळ्या दिवशी हस्तमैथून करणाºया उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील भटनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीष्मपाल यांना अटक करून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक हितेश अवस्थी यांनी गुरुवारी टिष्ट्वटरवर हे जाहीर केले.
पहिल्या दोन वेळेस या महिलेने लज्जेपोटी त्याकडे दुर्लक्ष केले. तिसºया वेळीही भीष्मपाल यांनी तिला बोलावले तेव्हा ती गुपचूप व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याच्या तयारीने गेली. भीष्मपाल यांनी पुन्हा तेच निर्लज्ज कृत्य केल्यावर तिने त्याचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ वरिष्ठांना पाठविला.
केले व्हिडिओ रेकॉर्डिंग
एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले की, ही महिला जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाची फिर्याद नोंदविण्यासाठी भटनी पोलीस ठाण्यात आईसोबत गेली होती. निरीक्षक भीष्मपाल यांनी तिला तीन दिवस बोलावून घेतले. प्रत्येक वेळी ती समोर येऊन बसली की हे भीष्मपाल आपल्या खुर्चीत बसल्या बसल्या, तिच्याकडे पाहत हस्तमैथून करायचे.