बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 20:24 IST2020-06-16T20:20:39+5:302020-06-16T20:24:51+5:30
अल्पवयीन मुलीने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या वडिलांनीच लॉकडाऊनचा काळात २ महिने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर गरोदर राहिल्यानंतर वडिलांनी गर्भपात करण्यासाठी औषध दिल्याचे तिने म्हटले आहे.

बाप की नरपिशाच्च? लॉकडाऊनमध्ये पोटच्या मुलीवर बलात्कार करून द्यायचा गर्भपाताचे औषध
कानपूर - बाप लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. वडिल लॉकडाऊनमध्ये मुलीचे नेहमी लैंगिक शोषण करत होते आणि गर्भपात करण्यासाठी गोळ्या देखील तिला दिल्या. असा आरोप अल्पवयीन मुलीने तक्रारीत केला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर परिसरात घडली आहे.
अल्पवयीन मुलीने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या वडिलांनीच लॉकडाऊनचा काळात २ महिने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर गरोदर राहिल्यानंतर वडिलांनी गर्भपात करण्यासाठी औषध दिल्याचे तिने म्हटले आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या वडिलांविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठेकल्या आहेत.
अल्पवयीन मुलीच्या वडिलांना दारूचे व्यसन आहे. व्यसनामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्याची पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह भाड्याच्या घरात स्वतंत्र राहते. दुसरी मुलगी वडिलांसोबत राहाते. लॉकडाऊन झाल्यापासून वडिलांनी आपल्या मुलीसोबत जबरदस्ती शरीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गरोदर राहिल्यानंतर नराधम बापाने गर्भपात करण्यासाठी औषध तिला दिले, असा आरोप अल्पवयीन मुलीने वडिलांवर केला. नेहमीच्या त्रासाला वैतागून पीडित मुलीने पोलिसात तक्रार दिली. आईला याबाबत माहिती मिळताच तिने देखील पोलीस ठाणे गाठले. अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वडिलांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वडिलांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
तब्बल २२५ कोटींची केली कर चुकवेगिरी, ठग उद्योगपतीला मुंबईतून अटक
अखेर बदला घेतला! सरपंचाची हत्या केलेल्या हिजबुलच्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा
लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल
डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर
कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नागपूरला बदली
पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात