Crime News UP: आधी चौघांकडून सामूहिक बलात्कार, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर अधिकाऱ्यानेही केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 10:53 AM2022-05-04T10:53:42+5:302022-05-04T10:53:49+5:30

Crime News UP: एका 13 वर्षीय मुलीवर आधी चौघांकडून सलग तीन दिवस सामूहिक बलात्कार आणि नंतर पोलीस स्टेसनमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

Uttar Pradesh: first gang rape by four persons, then police officer also raped her in police station | Crime News UP: आधी चौघांकडून सामूहिक बलात्कार, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर अधिकाऱ्यानेही केला अत्याचार

Crime News UP: आधी चौघांकडून सामूहिक बलात्कार, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर अधिकाऱ्यानेही केला अत्याचार

Next

ललितपूर : उत्तर प्रदेशातील ललितपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 13 वर्षीय मुलीने SHO वर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, एसएचओ तिलकधारी सरोजने मुलीला खोलीत नेऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही घटना उघडकीस आल्यापासून एसएचओ फरार असून, त्याला एसपींनी निलंबित केले आहे.

आधी भोपाळमध्ये 4 मुलांकडून तीन दिवस बलात्कार
मिळालेल्या माहितीनुसार, याच मुलीवर आधी 4 जणांकडून सलग तीन दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. सोमवारी मुलीच्या आईने चाइल्ड लाईन टीमला सांगितले की, 22 एप्रिल रोजी चंदन, राज भान, हरिशंकर आणि महेंद्र चौरसिया यांनी मुलीला आमिष दाखवून भोपाळला नेले होते. तिथे त्या चौघांनी सलग 3 दिवस तिच्यावर बलात्कार केला. नंतर 25 एप्रिल रोजी पाली शहरातील पोलीस स्टेशनबाहेर सोडून आरोपी फरार झाले.

पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार
यानंतर पोलिसांनी तरुणीच्या मावशीला बोलावून तिला त्यांच्या ताब्यात दिले. 27 एप्रिल रोजी एसएचओने पोलिस ठाण्यात निवेदनासाठी बोलावले. तिथे त्याने संध्याकाळी उशिरा मुलीला आपल्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 30 एप्रिल रोजी पोलिसांनी तिला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावले आणि मुलीला चाईल्ड लाईनमध्ये पाठवण्यात आले. तिथे पीडितेने चाइल्ड लाईनला तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपी एसएचओ तिलकधारी सिंग सरोज, चंदन, राजभान, हरिशंकर, महेंद्र चौरसिया आणि एका महिलेविरुद्ध कलम 363, 376, 376बी, 120बी आणि पॉक्सो कायदा तसेच एससी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आल्याचे एसपी निखिल पाठक यांनी सांगितले. 

Web Title: Uttar Pradesh: first gang rape by four persons, then police officer also raped her in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.