लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचं बिंग फुटलं; पतीनं कुटुंबासह थेट पोलीस स्टेशन गाठलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 12:11 PM2021-06-21T12:11:58+5:302021-06-21T12:22:38+5:30

नवऱ्यानं पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार; एकूण ८ जणांविरोधात पोलिसांनी नोंदवला गुन्हा

in uttar pradesh groom found his newly married bride is transgender on first night | लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचं बिंग फुटलं; पतीनं कुटुंबासह थेट पोलीस स्टेशन गाठलं

लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचं बिंग फुटलं; पतीनं कुटुंबासह थेट पोलीस स्टेशन गाठलं

googlenewsNext

कानपूर: उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पनकी येथे वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्यानं त्यांच्या तृतीतपंथीय मुलीचा विवाह शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी लावून दिला. लग्नाच्या पहिल्या रात्री हा प्रकार तरुणाच्या लक्षात आला आणि दाम्पत्याचं भांडं फुटलं.

पत्नी तृतीयपंथी असल्याचं लक्षात येताच घरात वाद झाला. त्यानंतर लग्न करून सासरी आलेली तरुणी तिच्या माहेरी निघून गेली. या प्रकरणी तरुणानं काकादेव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तृतीयपंथी पत्नी, सासू-सासरे आणि लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थाविरोधात तरुणानं तक्रार नोंदवली आहे. एकूण ८ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

'तो' रेल्वे अपघातात दगावल्याचं सांगत ११ वर्षांपूर्वी कुटुंबीयांनी घेतली नोकरी; आता 'तो'च जिवंत परतला

शास्त्री नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या पियूषचा विवाह २८ एप्रिल २०२१ रोजी झाला. तरुणी तृतीयपंथी असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांना होती. मात्र यानंतरही विजय नगरमध्ये राहणाऱ्या सत्यदेव चौधरींनी लग्नासाठी मध्यस्थी केली. लग्नानंतर सत्य परिस्थिती समोर येताच कुटुंबाला एकच धक्का बसला. 

आता तुम्हाला दाखवतोच! न्याय न मिळाल्यानं वीज कर्मचाऱ्यांनी कनेक्शन कापलं; पोलीस स्टेशन अंधारात

आपण लग्न करण्यास तयार नव्हतो. पण कुटुंबियांनी जबरदस्तीनं विवाह लावून दिला, असं तरुणीनं सांगितलं. पोलखोल होताच तरुणी माहेरी निघून गेली. फसवणूक झाल्यानं पियूषनं ८ जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सल्ला घेतला जात आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला तरुणाची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर तरुणानं पत्नीचे वैद्यकीय अहवाल आणले. ते पाहून पोलिसांचा त्याच्यावर विश्वास बसला. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली. आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: in uttar pradesh groom found his newly married bride is transgender on first night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.