लग्नानंतर फक्त 5 दिवसांत पत्नीमुळे त्रस्त झाला पती, उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 02:12 PM2021-11-20T14:12:24+5:302021-11-20T14:14:15+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण प्रेयस (वय 23) याचे 14 नोव्हेंबर रोजी कोमल नावाच्या मुलीशी लग्न झाले होते आणि यानंतर पाच दिवसांनी शुक्रवारी शामली जिल्ह्यातील चुन्सा गावात त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. 

Uttar pradesh harassed by wife newly wed man kills self with poison | लग्नानंतर फक्त 5 दिवसांत पत्नीमुळे त्रस्त झाला पती, उचललं टोकाचं पाऊल

लग्नानंतर फक्त 5 दिवसांत पत्नीमुळे त्रस्त झाला पती, उचललं टोकाचं पाऊल

Next

उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) मुझफ्फरनगरमधील एका गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 23 वर्षीय नवविवाहित युवकाने लग्नानंतर केवळ 5 दिवसांतच आपली पत्नी आणि मेहुण्याच्या छळाला कंटाळून विष घेऊन आत्महत्या केली आहे. यासंदर्भात माहिती देताना पोलीस म्हणाले, बाबरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात शुक्रवारी ही घटना घडली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण प्रेयस (वय 23) याचे 14 नोव्हेंबर रोजी कोमल नावाच्या मुलीशी लग्न झाले होते आणि यानंतर पाच दिवसांनी शुक्रवारी शामली जिल्ह्यातील चुन्सा गावात त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. 

मृताची बहीण सीमा हिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत आरोप केला आहे, की मेहुणी कोमल आणि मेहुणीचा भाऊ नितीन कुमार यांच्या छळाला कंटाळून तिचा भाऊ प्रयास याने आत्महत्या केली. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तर दुसऱ्या एका घटनेत, आत्महत्येचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यात मदन कुमार नावाच्या 55 वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी कौटुंबिक वादातून जिल्ह्यातील ज्ञान माजरा गावात स्वतःला पेटवून घेतले. चारथवाल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, मदनला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
 

Read in English

Web Title: Uttar pradesh harassed by wife newly wed man kills self with poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.