पॉर्न फिल्म्स पाहण्यासाठी पती टाकायचा दबाव; वाद वाढला, पत्नीनं उचललं असं पाऊल अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 01:27 PM2021-08-07T13:27:51+5:302021-08-07T13:30:36+5:30
पोलिसांनी समुपदेशन सुरू केले अन् वादाचे वेगळेच कारण समोर आले...
मेरठ - येथे पती आणि पत्नी यांच्यातील वाद एवढा वाढला, की तो थेट कौटुंबिक समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचला. प्रथमत:, पीडित पत्नीने हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी समुपदेशन सुरू केल्यानंतर, वादाचे वेगळेच कारण समोर आले. खरे तर, हा वाद पॉर्न फिल्म्स पाहण्यावरून निर्माण झाला होता. यानंतर, आता पती आणि पत्नी यांच्यात, बेडरूममध्ये मोबाइल बॅन असेल, असा करार झाला आहे.
जुलै 2020मध्ये झाले होते लग्न -
येथील दौराळा भागातील एका 25 वर्षीय तरुणीचे जुलै 2020 मध्ये मेरठच्या इंचोली भागातील तरुणाशी लग्न झाले होते. नवविवाहितेने सासरच्या मंडळींवर हुंड्याची मागणी केल्याचा आरोप करत पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. एढेच नाही, तर पती आपल्याला मारहाण करतो आणि शारीरिक शोषण करतो, असेही तिने म्हटले होते. यानंतर, एसपी क्राईमने हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठवले. समुपदेशन केंद्रात, सीओ रूपाली राय आणि पीपीके प्रभारी मोनिका जिंदाल आणि इतर समुपदेशकांनी जोडप्याचे वेगवेगळ्या आरोपांवर समुपदेशन केले. यात, हे प्रकरण हुंड्याशी संबंधित नाही, असे दिसून आले.
समुपदेशनादरम्यान संबंधित महिलेने सांगितले की, लग्नानंतर पती बेडरूममध्ये मोबाईलवर पॉर्न फिल्म्स बघायचा. एवढेच नाही, तर तो पॉर्न फिल्म्स पाहून तिचा मानसिक आणि शारीरिक छळही करायचा. एवढेच नाही, तर याला विरोध केल्यानंतरही तिचा छळ करण्यात आला, असेही तिने सांगितले होते. याच बरोबर, पतीने पॉर्न फिल्म्सची सवय सोडली, तरच आपण त्याच्यासोबत सासरी जाऊ, असेही पीडितेने म्हटले होते.
पतीनं मान्य केली अट -
पतीकडे बेडरूममध्ये मोबाईल दिसणार नाही आणि घरात आपल्या समोरच मोबाइलवर बोलावे लागेल, अशी अट पत्नीने पतीसमोर ठेवली आहे. यानंतर पतीने पत्नीची अट मान्य केली आहे. तसेच, आता आपण मोबाइलवर पॉर्न फिल्म्स पाहणार नाही आणि यासाठी आपल्या पत्नीवरही दबाव टाकणार नाही, असेही पतीने म्हटले आहे. यासंदर्भात त्याने पोलिसांना लेखी निवेदनही दिले आहे.