भयंकर! आई ओरडली म्हणून 'तिने' घर सोडलं पण नराधमांनी गाठलं; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 15:52 IST2021-06-16T15:42:23+5:302021-06-16T15:52:38+5:30
Crime News : आई ओरडली म्हणून एका अल्पवयीन मुलीने घर सोडल्याची घटना घडली आहे.

भयंकर! आई ओरडली म्हणून 'तिने' घर सोडलं पण नराधमांनी गाठलं; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
नवी दिल्ली - देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. आई ओरडली म्हणून एका अल्पवयीन मुलीने घर सोडल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीला वाटेत काही नराधमांनी गाठलं आणि तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी काही आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास देखील करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या ग्रामीण भागातील इटौंजा भागात संबंधित घटना घडली आहे. आई ओरडली म्हणून 14 वर्षीय मुलगी नाराज होऊन घराबाहेर पडली. तिने घरी परत येणार नाही, अशी आई-वडिलांना धमकी दिली. ती घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर तिच्या वडिलांनी इटौंजा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार केली होती. याच दरम्यान रस्त्याने चालताना एक ई-रिक्षाचालक मुलीला भेटला. इकरामुद्दीन असं या रिक्षाचालकाचं नाव असून त्याने तिची विचारपूस केली.
धक्कादायक! "आरोपी तरुणीच्या घरात शिरला मग...."; रागाच्या भरात 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल#crime#crimenews#marriage#Policehttps://t.co/3UPfFih61Z
— Lokmat (@MiLOKMAT) June 16, 2021
मुलीने खूप भूक लागल्याचं सांगितलं असता त्याने तिला आपल्यासोबत चल असं सांगितलं. तसेच तुझ्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करू असं देखील म्हटलं. त्यामुळे मुलगी घरी जाण्यास तयार झाली. इकरामुद्दीनने मुलीला घरी नेल्यानंतर त्याच्या पाच मित्रांना फोन करुन घरी बोलावलं. त्यानंतर सहा जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपीने जेवण घेऊन येण्याच्या बहाण्याने मित्रांना फोन केला. पोलिसांनी आरोपी इकरामुद्दीन याच्यासह त्याचे मित्र शकील, उत्तम शर्मा, मोहम्मद नफीस, नूर मोहम्मद आणि रितेश यादव यांना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
माणुसकीला काळीमा! तरुणांनी वृद्धाचं अपहरण केलं, जंगलात नेलं आणि जबरदस्तीने 'जय श्री राम' बोलायला लावलं#Crime#Policehttps://t.co/q4WfrLkA1c
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2021
भयंकर! मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार; घटनेने खळबळ
आपल्या मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये ही घटना समोर आली आहे. आपल्या मित्रांसोबत स्कूटीवर फिरायला गेलेल्या तरुणीचं काही तरुणांनी अपहरण केलं. आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच पीडित तरुणीला आणि तिच्या मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली. तरुणी मित्रांसोबत फिरायला गेली असताना काही तरुणांनी त्यांना अडवलं आणि पीडित तरुणीला एका अज्ञातस्थळी नेलं. आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी इज्जतनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाकाबंदी असताना अडवलं म्हणून संतप्त झाल्या महिला आमदार; पोलिसांवरच उचलला हात#crime#crimenews#Policehttps://t.co/5nFfZJJiUQ
— Lokmat (@MiLOKMAT) June 15, 2021