महंतानं रात्री महिला शिक्षिकेला पाठवला अश्लील PHOTO; पोलिसांना दिलं धक्कादायक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 12:55 AM2022-10-03T00:55:45+5:302022-10-03T00:56:35+5:30

मथुरा-वृंदावनमधील एका महाविद्यालयातील महिला शिक्षिकेने एका सांप्रदायाच्या महंतावर, मोबाईल फोनवर अश्लील फोटो पाठवल्याचा आणि अपमान केल्याचा आरोप केला आहे.

Uttar pradesh Mahant sent obscene picture to female teacher at night gave this shocking answer when caught | महंतानं रात्री महिला शिक्षिकेला पाठवला अश्लील PHOTO; पोलिसांना दिलं धक्कादायक उत्तर

प्रतिकात्मक फोटो.

googlenewsNext

मथुरेत एका महिला शिक्षिकेने महंतावर अश्लील कृत्य केल्याचा गंभीर आरोप करत, त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महंताच्या फोनवरून संबंधित महिला शिक्षिकेला अश्लील फोटो पाठविण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. या महिला शिक्षिकेच्या आरोपांनंतर महंतांनी पोलिसांना धक्कादायक उत्तर दिले आहे. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. 

महिला शिक्षिकेनं महंतावरकेले गंभीर आरोप - 
मथुरा-वृंदावनमधील एका महाविद्यालयातील महिला शिक्षिकेने एका सांप्रदायाच्या महंतावर, मोबाईल फोनवर अश्लील फोटो पाठवल्याचा आणि अपमान केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या शिक्षिकेच्या तक्रारीवरून आरोपी महंताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संबंधित शिक्षिका एक सामाजिक कार्यकर्ताही आहे. दाखल करण्यात आलेल्या FIR नुसार, संबंधित महिला शिक्षिकेने पोलिसांना दोन मोबाइल नंबरसंदर्भात माहिती देत, या नंबरवरून आपल्याला 20 मेच्या रात्री एक अश्लील फोटो पाठवण्यात आला, असे म्हटले आहे. तसेच, हे नंबर चैतन्य कुटी येथील चतुः सांप्रदायाचे महंत फूलडोल बिहारी दास यांचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप -
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली केवळ वेळ घावला. यानंतर अनेक वेळा विनंती करणारे पत्र दिल्यानंतर, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. मात्र, पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये घटनेची सूचना मिळाल्याची तारीख 25 मेच टाकली आहे, असे संबंधित शिक्षिकेने म्हटले आहे.

काय म्हणाले महंत? -
महिलेला अश्लील फोटो पाठविण्यासंदर्भातील प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे सोपवण्यात आला आहे. याचा अहवाल आल्यानंतर, कारवाई करण्यात येईल, असे वृन्दावन पोलीस ठाण्याचे प्रमुख सूरज प्रकाश शर्मा यांनी सांगितले. एवढेच नाही, तर, हे प्रकरण सध्या आयटी अॅक्टच्या कलम 67 अंतर्गत दाखल करण्यात आले आहे. तसेच अहवाल आल्यानंतर आवश्यकतेनुसार आणखी कलमेही जोडली जाऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, आपल्या मोबाइलवरून कुण्या मुलाकडून चुकून फोटो पाठविला गेला होता, असे सांगत संबंधित महतांनी खेदही व्यक्त केला आहे, असेही शर्मा यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Uttar pradesh Mahant sent obscene picture to female teacher at night gave this shocking answer when caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.