रस्त्यावर सुरू होती तुफान हाणामारी; तेवढ्यात कारने दोन मुलांना उडवले, पहा video...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 02:11 PM2022-09-22T14:11:56+5:302022-09-22T14:13:04+5:30

रस्त्यावर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची हाणामारी सुरू होती, तेवढ्यात एक भरधाव कार तिथे येते.

Uttar Pradesh News | fight was going on the streets; Then car hit two students, watch the video... | रस्त्यावर सुरू होती तुफान हाणामारी; तेवढ्यात कारने दोन मुलांना उडवले, पहा video...

रस्त्यावर सुरू होती तुफान हाणामारी; तेवढ्यात कारने दोन मुलांना उडवले, पहा video...

googlenewsNext

गाझियाबाद:उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव कारने रस्त्यावर भांडणाऱ्या दोन तरुणांना धडक मारुन हवेत उडवल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ गाझियाबादमधील मसुरी येथील असल्याचे सांगितले जात असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

रस्त्यावर भांडण करणारे विद्यार्थी मसुरी येथील एका खासगी महाविद्यालयाचे असल्याची माहिती मिळाली आहे. सीनिअर आणि जुनिअर विद्यार्थ्यांमध्ये हे भांडण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेतील काही विद्यार्थी फरार असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. एका कारमधील व्यक्तीने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.

नेमकं काय झालं?
व्हायरल व्हिडीओमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर हाणामारी करताना दिसत आहे. तेवढ्यात एक भरधाव कार येते आणि दोन विद्यार्थ्यांना भरधाव वेगाने उडवले. ही धडक इतकी जोराची असते की, विद्यार्थी हवेत उडतात. विशेष म्हणजे, या धडकेने विद्यार्त्यांना काहीच होत नाही, आणि ते पुन्हा मारामारी सुरू करतात. 

कार जप्त, अनेक विद्यार्थी ताब्यात
या घटनेनंतर पोलिसांनी काही मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. विद्यार्थ्यांना धडक देणारे वाहनदेखील जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
 

Web Title: Uttar Pradesh News | fight was going on the streets; Then car hit two students, watch the video...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.