घर मालकासोबत लुडो खेळताना स्वतःलाही डावावर लावलं अन् हरली, पतीच्या दाव्यावर पत्नीचा यू-टर्न; अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 12:04 PM2022-12-07T12:04:36+5:302022-12-07T12:05:59+5:30
हे संपूर्ण प्रकरण प्रतापगड जिल्ह्यातील देवकाली येथील आहे. येथे पती उमेश आणि त्याची पत्नी रेणू एका भाड्याच्या घरात राहत होते. येथे उमेशने पत्नी रेणूला लुडो खेळाचे व्यसन असल्याचा आरोप करत, पोलिसात तक्रार दाखल केली आहे...
उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधून पती आणि पत्नीच्या वादाचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे, या वादाचे कारण ठरला आहे 'लुडो गेम'. यासंदर्भात पतीने आरोप केला आहे, की त्याची पत्नी घर मालकासोबत लुडो आणि पत्ते खेळण्याच्या नादात एवढी गुंग झाली, की तिने पैशांसोबतच स्वतःलाही डावावर लावले आणि हरली. याच बरोबर, आपण जयपूरमध्ये दिवस-रात्र मेहनत करत होतो आणि सर्व कमाई पत्नीला पाठवत होतो. याचा तिच्याकडे कधीही हिशोब मागितला नाही, यामुळे मला काहीच कळले नाही, असेही संबंधित महिलेच्या पतीने म्हटले आहे.
मात्र, आता हे संपूर्ण प्रकरण उलटे झाले आहे. आता पत्नीनेच पतीला जुगाराचे व्यसन असल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्याला असे कुठलेही व्यसन नाही, असेही तिने म्हटले आहे.
लुडो खेळाचे व्यसन असल्याचा आरोप -
हे संपूर्ण प्रकरण प्रतापगड जिल्ह्यातील देवकाली येथील आहे. येथे पती उमेश आणि त्याची पत्नी रेणू एका भाड्याच्या घरात राहत होते. येथे उमेशने पत्नी रेणूला लुडो खेळाचे व्यसन असल्याचा आरोप करत, पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यात आपली पत्नी लुडो खेळताना हरल्यानंतर, घर मालकाकडे राहू लागली आहे. महिलेच्या पतीच्या तक्रारीनुसार, तो सहा महिन्यांपूर्वी कामानिमित्त जयपूरला गेला होता. यादरम्यान तो घरी पैसे पाठवत राहिला, तर लुडोचे व्यसन असलेल्या पत्नीने सर्व पैसे जुगारावर खर्च केले.
लूडोमध्ये स्वतःलाही डावात लावले -
रेणूच्या पतीने दावा केला आहे की, लुडो खेळताना पैसे संपल्यानंतर आपल्या पत्नीने स्वतःला डावात लावले आणि हरली. पतीच्या म्हणण्यानुसार, महिला आता घरमालकाकडे राहते. एवढेच नाही, तर त्याने तिला सोडविण्याचाही प्रयत्न केला. पण ती ऐकायला तयार नाही.
माझ्या पतीलाच जुगाराचं व्यवसन -
यावर महिलेनेही, आपल्याला जुगाराचे व्यसन नसून आपल्या पतीलाच जुगाराचे व्यसन आहे, असादावा केला आहे. यावर आता, पोलीस तक्रारदार पतीचा शोध घेत आहेत. संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले, की “माझ्या पतीलाच जुगाराचे व्यसन आहे. मला असे कुठलेही व्यसन नाही. मी व्यवसायाने घर कामगार आहे आणि घर चालविण्यासाठी मेहनत करते.