Uttar Pradesh : शिक्षकानं मारलं, म्हणून शाळेच्या बॅगमध्ये अवैध कट्टा घेऊन पोहोचला 10वीचा विद्यार्थी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 04:34 PM2022-08-31T16:34:40+5:302022-08-31T16:35:57+5:30

शाळेत तपासणीदरम्यान त्याला पकडण्यात आले. यानंतर शाळेतील शिक्षकांनी संबंधित मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या अवैध कट्ट्यासंदर्भात पोलीस मुलाची चौकशी करत आहेत.

Uttar Pradesh prayagraj 10th student arrives with illegal weapon in the school bag after being beaten by teacher | Uttar Pradesh : शिक्षकानं मारलं, म्हणून शाळेच्या बॅगमध्ये अवैध कट्टा घेऊन पोहोचला 10वीचा विद्यार्थी अन्...

Uttar Pradesh : शिक्षकानं मारलं, म्हणून शाळेच्या बॅगमध्ये अवैध कट्टा घेऊन पोहोचला 10वीचा विद्यार्थी अन्...

Next

प्रयागराजमधील संगम नगरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक 10 वीचा विद्यार्थी अवैध कट्टा घेऊन थेट शाळेत पोहोचला. मात्र, शाळेत तपासणीदरम्यान त्याला पकडण्यात आले. यानंतर शाळेतील शिक्षकांनी संबंधित मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या अवैध कट्ट्यासंदर्भात पोलीस मुलाची चौकशी करत आहेत. ही घटना येथील सोरांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

एक 15 वर्षांचा मुलगा अब्दालपूर खास येथे एका शाळेत 10व्या वर्गात शिकतो. त्याने त्याच्या बॅगमध्ये अवैध शस्त्र ठेवले होते. तो जेव्हा शाळेत आला, तेव्हा त्याच्या बॅगची चेकिंग करण्यात आली. त्यात एक कट्टा निघाला. हे पाहून संपूर्ण शाळेतच खळबळ उडाली. यानंतर शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्याला पकडले आणि पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

पोलीस ठाण्याचे प्रमुख अशोक कुमार यानी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाकडून अवैध शस्त्रासंदर्भात माहिती गोळा केली जात आहे. याच बरोबर, शाळेत काही कारणांवरून शिक्षक त्याच्यावर रागावले होते. तसेच सर्वांसमोर त्याला कोंबडा व्हायलाही सांगितले होते. यामुळे तो प्रचंड संतापला होता आणि यातूनच तो दुसऱ्या दिवशी शिक्षकाला धमकावण्यासाठी बॅगमध्ये कट्टा घेऊन पोहोचला, अशी चर्चा येथील लोकांमध्ये आहे.

महत्वाचे म्हणजे, संबंधित विद्यार्थ्याने कुण्या दुसऱ्या मुलाकडून हा अवैध कट्टा खरेदी केला होता, असेही पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेतले आहे.  दोन्ही आरोपी मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Uttar Pradesh prayagraj 10th student arrives with illegal weapon in the school bag after being beaten by teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.