दे दणादण! फॅमिली कोर्टात दोन महिला वकील भिडल्या; एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 06:01 PM2022-10-29T18:01:07+5:302022-10-29T18:08:13+5:30
दोन्ही महिला वकील आपाआपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी कोर्टात आल्या होत्या. त्यावेळी काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं.
उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. फॅमिली कोर्टात दोन महिला वकील भिडल्या, एकमेकींच्या जीवावर उठल्याची भयंकर घटना समोर आली आहे. कोर्टात त्यांच्यामध्ये छोट्या-मोठ्या कारणावरून वाद झाला आणि त्यांनी तिथंच एकमेकींना मारहाण करण्यास सुरू केली. एकमेकींचे केस ओढले. कोर्ट परिसरात तुफान राडा झालेला पाहायला मिळाला. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कासगंज न्यायालयातील हा व्हिडीओ आहे. फॅमिली कोर्टाबाहेर हा धक्कादायक प्रकार घडला. दोन्ही महिला वकील आपाआपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी कोर्टात आल्या होत्या. त्यावेळी काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी ही मारामारी आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली. व्हिडीओत दोन्ही महिला वकील एकमेकींचे केस ओढत असल्याचं दिसत आहे.
महिला वकिलांना भांडताना पाहून सर्वच जण हैराण झाले. महिला कॉन्स्टेबलसह अनेकांनी मध्यस्थी करून हे भांडण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण दोघीही ऐकत नाहीत. एकमेकींना बेदम मारहाण करतात. योग्यता सक्सेना आणि सुनीता कौशिक अशी या दोघींची नावं आहेत. त्या कासगंज आणि अलीगडच्या रहिवासी आहेत. राहुल बोस आणि पारूल सक्सेना पती-पत्नी आहेत.
राहुल आणि पारूल या दोघांना कोर्टाने तारीख दिली होती. याच दरम्यान दोन वकिलांमध्ये काही कारणांमुळे वाद झाला. पुढे त्या वादाचं रुपांतर हे हाणामारीत झालं. दोन्ही महिला वकिलांनी एकमेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फॅमिली कोर्टात हे सर्व घडल्याने मारामारी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. काही लोकांनी याचा व्हिडीओ देखील काढला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"