भयंकर! घरात घुसलेल्या चोराला कुटुंबानं पकडलं; खोलीत बंद करून दिली भयानक शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 10:00 AM2022-02-14T10:00:29+5:302022-02-14T10:01:35+5:30

दोनपैकी एका चोराला कुटुंबासह शेजाऱ्यांनी पकडलं; पोलिसांकडून गुन्हा दाखल

uttar pradesh unnao people give electric shocks punishment to thief | भयंकर! घरात घुसलेल्या चोराला कुटुंबानं पकडलं; खोलीत बंद करून दिली भयानक शिक्षा

भयंकर! घरात घुसलेल्या चोराला कुटुंबानं पकडलं; खोलीत बंद करून दिली भयानक शिक्षा

googlenewsNext

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये गंगाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला आहे. आझाद नगरमध्ये असलेल्या एका घरात दोन चोर शिरले. त्यांनी घरातील रोख रक्कम आणि दागिने गोळा केले. दोघे पोबारा करण्याच्या तयारीत असताना कुटुंबातील काहींना अचानक जाग आली. याची चाहूल लागताच चोर पळू लागले. कुटुंबीयांना आरडाओरड केल्यानं शेजारचे लोक उठले. त्यांनी एका चोरट्याला पकडलं. तर दुसरा चोरटा रोकड आणि दागिने घेऊन पसार झाला.

पकडलेल्या चोरट्याला लोकांनी एका बंद खोलीत नेलं आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला इलेक्ट्रिक शॉकही दिला. चोरीची माहिती गंगाघाट पोलिसांना देण्यात आली. त्यांनी चोराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. चोरानं घरातील बॉक्स आणि तिजोरीचं कुलूप फोडून रोकड आणि दागिने चोरल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी चोराला चोप देऊन त्याला इलेक्ट्रिक करंटदेखील दिला.

चोराचं नाव शकील असल्याची माहिती उन्नावचे एएसपी शशी शेखर सिंह यांनी दिली. शकील सोबत असलेला रईसुद्दीन घटनास्थळावरून फरार झाला. त्याच्याकडेच रोकड आणि दागिने होते. पोलिसांनी आरोपीची बंद खोलीतून सुटका केली. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चोरासोबतच त्याला मारहाण करणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: uttar pradesh unnao people give electric shocks punishment to thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.