पत्नी असतानाही बँक मॅनेजरने अशी बनवली गर्लफ्रेंड; लग्न, सेक्स अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 02:20 PM2022-05-27T14:20:33+5:302022-05-27T14:21:08+5:30
पीडितेने केलेल्या आरोपानुसार, प्रणवने पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे सांगून तिच्यासोबत मंदिरात जाऊन लग्न केले होते. यानंतर तो सातत्याने लैंगीक शोषण करत होता.
उत्तर प्रदेशातील लखनौमधील गोमतीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील स्टेट बँकेच्या हजतरगंज शाखेच्या मॅनेजरला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुरुवारी पोलीसांनी अटक केली. प्रणव द्विवेदी असे या आरोपीचे नाव आहे.
पीडितेने केलेल्या आरोपानुसार, प्रणवने पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याचे सांगून तिच्यासोबत मंदिरात जाऊन लग्न केले होते. यानंतर तो सातत्याने लैंगीक शोषण करत होता. पण, सत्य समोर आल्यानतंर संबंधित पीडितेने प्रणवविरोधात बुधवारी गोमतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पहिली पत्नी त्रास देते... तिला घटस्फोट देईन -
गोमतीनगर येथील संबंधित पीडिता (26) बँकेत कर्मचारी आहे. ती गेल्या अनेक दिवसांपासून भोपाळच्या मालवीयनगर येथील प्रणवला ओळखत होती. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, कामादरम्यानच त्यांची ओळख झाली होती. तो म्हणत होता, की पत्नीच्या वगण्यामुळे तो त्रस्त झाला आहे आणि लवकरच पत्नीला तलाक देणार आहे. याच बरोबर त्याने पीडितेलाही लग्नाचा प्रस्ताव दिला होता. यावर तीही राजी झाली. यानंतर तो तिचे सातत्याने शोषण करत होता.
मंदिरात केलं लग्न -
तरुणीने म्हटल्याप्रमाणे, ती प्रणववर अनेक दिवसांपासून लग्नासाठी दबाव टाकत होती. अखेर 23 मे रोजी आरोपी संबंधित तरुणीला आपल्यासोबत घेऊन गेला. यानंतर त्याने गोमतीनगर येथील मंदिरात तिच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर प्रणवने तरुणीला घरी जाण्यास सांगितले. पण ती प्रणवसोबत जाण्यावर ठाम होती. यावर प्रणवने मुलीला घरी घेऊन जाण्यास नकार देत धमकावले होते.
पत्नीसह चाकू घेऊन पोहोचला होता घरी -
पीडितेने सांगितल्यानुसार, तिने प्रणवच्या पहिल्या पत्नीला मंदिरात लग्न केल्याची माहितीही दिली होती. यावर आरोपीची पत्नी लखनौला आली. यानंतर 24 मे रोजी रात्री प्रणव पत्नीसह तिच्या घरी पोहोचला. येथे या दोघांनीही तिला मारहाण केली आणि चाकूने हल्ला करून जखमी केले. एवढेच नाही, तर मॅनेजरच्या पत्नीने आपल्याला आत्महत्या करण्यासाठीही विवश केले होते, असा गंभीर आरोपही संबंधित पीडितेने केला आहे.