वहिनीला घेऊन प्रियकर पळाला; संतापलेल्या दिरानं त्याचं गुप्तांगच कापलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 09:53 AM2022-01-09T09:53:02+5:302022-01-09T10:35:25+5:30
चौकशीत आरोपीने भावाची पत्नी पळून जात त्याच्यासोबत युवकासोबत राहत असल्याचं म्हटलं.
बरेली – उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका युवकाच्या हत्येने खळबळ माजली आहे. मृत युवक आणि आरोपीचे कुटुंब हरियाणा येथे मजुरी करण्यासाठी गेले होते. तेव्हा मृत युवक आणि आरोपीच्या वहिनीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर मृत युवक महिलेला घेऊन पसार झाला. त्यानंतर महिलेला परत पाठवत नसल्याने आरोपी दीर संतापला. त्या रागाच्या भरात आरोपी चंद्रपालने युवकाविरोधात हत्येचे षडयंत्र रचलं आणि त्याचा काटा काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवकाच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम केले तेव्हा त्याच्यावर ११ वेळा चाकूने हल्ला केल्याचं आढळलं. आरोपीने मृत युवकाचे गुप्तांगही अर्धे कापले. चौकशीत आरोपीने भावाची पत्नी पळून जात त्याच्यासोबत युवकासोबत राहत असल्याचं म्हटलं. हरियाणात मजुरी करताना मृत युवक राहुल आरोपीच्या कुटुंबासोबत राहत होता. त्यावेळी भावाची पत्नी आणि राहुल यांच्यात प्रेमसंबंध बनले. संधी मिळताच राहुल महिलेसोबत पळाला. याची माहिती मिळताच आरोपी राहुलच्या घरी गेला तिथे महिलेला सोबत घेऊन जाणार असल्याचं म्हटलं परंतु राहुलने त्याला नकार दिला.
त्यानंतर संतापलेल्या आरोपीने राहुलचा काटा काढण्यासाठी प्लॅन बनवला. आरोपीने राहुलला विश्वासात घेतले. ७ जूनला त्याने राहुलला फोन करुन बरेली जंक्शनला बोलावलं. राहुल आणि आरोपी दोघंही नशेत होते. जंक्शनवर असणाऱ्या गर्दीमुळे त्याला हत्या करणं शक्य झालं नाही. त्यानंतर उड्डाणपूलावर गेल्यानंतर आरोपीनं राहुलची चाकूने हत्या केली.
सावत्र वडील आणि सख्ख्या भावाचीही केलीय हत्या
आरोपी चंद्रपालच्या चौकशीत त्याने सांगितले की, त्याचे वडील रामस्वरुप यांचा मृत्यू झाला त्यानंतर आईने दुसरा विवाह केला. सावत्र बापाची माझ्या पत्नीवर वाईट नजर होती. तर सख्खा भाऊही पित्याला पाठिशी घालायचा. त्यामुळे २००१ मध्ये त्याने सावत्र वडील आणि सख्ख्या भावाची हत्या केली. या डबल मर्डरच्या प्रकरणात चंद्रपाल जेलची शिक्षा भोगून आला आहे.
असा झाला हत्येचा खुलासा
सुभाषनगरच्या पोलीस निरिक्षकाने सांगितले की, २०१९ मध्ये घटनेच्या ७२ तासानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पोलीस वारंवार जाहिरात देऊन सर्व पोलीस ठाण्यांना सूचित करत होती. त्यावेळी राहुलच्या कुटुंबाने मृतकाची ओळख पटवली. मृतकाच्या कुटुंबाने आरोपीच्या संशय घेतला. त्यानंतर चौकशीत हा गुन्हा कबुल करण्यात आला. मृतकाच्या हातातील कडा आणि जीन्स टिशर्टमुळे मृत राहुलची ओळख पटली होती.