धक्कादायक! भाजपा खासदाराचं मंदिरात गैरवर्तन, पुजाऱ्यांना केली शिवीगाळ; Video जोरदार व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 04:35 PM2021-08-02T16:35:16+5:302021-08-02T16:52:52+5:30
BJP MP Dharmendra Kashyap : कोरोना काळात घातलेल्या निर्बंधामुळे मंदिर बंद करण्याची वेळ झाली असल्याचं पुजाऱ्यांनी खासदारांना सांगितलं. मात्र म्हणणं ऐकून घेण्याऐवजी त्यांना दम आणि शिवीगाळ केल्याची तक्रार मंदिर प्रशासनाने पोलिसात केली आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या आवलाचे खासदार धर्मेंद्र कश्यप उत्तराखंडच्या जागेश्वर धाममध्ये दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पुजाऱ्यांना शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. कोरोना काळात घातलेल्या निर्बंधामुळे मंदिर बंद करण्याची वेळ झाली असल्याचं पुजाऱ्यांनी खासदारांना सांगितलं. मात्र म्हणणं ऐकून घेण्याऐवजी त्यांना दम आणि शिवीगाळ केल्याची तक्रार मंदिर प्रशासनाने पोलिसात केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. धर्मेंद्र कश्यप यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कश्यप पुजाऱ्यांना दम देताना तसेच शिवीगाळ करताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 31 जुलै रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. खासदार धर्मेंद्र कश्यप आणि तीन जण दुपारी 3.30 च्या दरम्यान मंदिरात आले होते. त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत ते मंदिरात बसून होते. सध्या कोरोना निर्बंधामुळे हे मंदिर संध्याकाळी सहा वाजता बंद होतं. मंदिर प्रशासनाने केलेल्या तक्रारीनुसार, पुजाऱ्यांनी खासदारांना मंदिरातून बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र त्यांनी गैरवर्तन करत शिवीगाळ केली.
FIR registered against BJP MP from Aonla, Uttar Pradesh, Dharmendra Kashyap and his friends for allegedly misbehaving with priests of Jageshwar Dham in Almora, Uttarakhand: Almora SDM Monika
— ANI (@ANI) August 2, 2021
(In pic - MP Dharmendra Kashyap, courtesy Lok Sabha website) pic.twitter.com/cPartNRHp1
खासदार धर्मेंद्र कश्यप आणि तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम 504 आणि 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मंदिरातून जाण्यास सांगितलं असता खासदारांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या गैरवर्तनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या नंतर काँग्रेसने भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. उत्तराखंडचे काँग्रेस नेते गोविंद सिंह कुंजवाल यांनी भाजपा खासदाराच्या गैरवर्तवणुकीनंतर ठिय्या आंदोलन केलं. त्यांच्यासोबत मंदिर समितीतील लोकांनी देखील आंदोलन केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! रागाच्या भरात पतीने बाळाला पत्नीच्या हातातून खेचून घेऊन जमिनीवर आपटलं अन्...#crime#crimesnews#Policehttps://t.co/tCuZEasbac
— Lokmat (@MiLOKMAT) August 1, 2021
बलात्कार करुन काढले अश्लील फोटो; ब्लॅकमेल करून उकळले 1 कोटी, 3 किलो सोनं अन् 15 किलो चांदीचे दागिने
मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका तरुणीवर बलात्कार करुन, तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची भयंकर घटना समोर आली आहे. फक्त पैसेच नाहीत तर सोन्या-चांदीचे दागिने देखील घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी पीडितेच्या भावाने काही पैसे काढण्यासाठी आपली तिजोरी उघडली, तेव्हा तिथले पैसे गायब झाल्याचं त्याच्या लक्षात आले. यानंतर हा सर्व भयंकर प्रकार उघड झाला. आरोपीने तरुणीकडू एक कोटींहून अधिक रोख रक्कम, तीन किलो सोनं आणि 15 किलो चांदीचे दागिने उकळले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बापरे! बहिणीच्या मदतीने मारला डल्ला, सोन्या-चांदीच्या दागिन्यांची केली चोरी#crime#crimesnews#Policehttps://t.co/90Y2PeAa4G
— Lokmat (@MiLOKMAT) August 1, 2021