वज्रेश्वरी हादरलं! दाम्पत्याची गळा चिरून हत्या; कारण अस्पष्ट, वाद मालमत्तेचा? संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 05:26 AM2022-01-23T05:26:26+5:302022-01-23T05:28:21+5:30

भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरीजवळील पेंढारीपाडा येथील वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केल्याची घटना घडली.

vajreshwari couple strangled to death and suspect in the custody | वज्रेश्वरी हादरलं! दाम्पत्याची गळा चिरून हत्या; कारण अस्पष्ट, वाद मालमत्तेचा? संशयित ताब्यात

वज्रेश्वरी हादरलं! दाम्पत्याची गळा चिरून हत्या; कारण अस्पष्ट, वाद मालमत्तेचा? संशयित ताब्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरीजवळील पेंढारीपाडा येथील वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. जगन्नाथ (बाळू) पाटील (वय ८३), सत्यभामा पाटील (वय ७५), अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी वज्रेश्वरी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

वज्रेश्वरीजवळ अंबाडी रस्त्यालगत असलेल्या आपल्या घरात दोघेच शेती करून राहत होते. त्यांची घराजवळ तीस एकरहून अधिक शेती आहे. त्यात त्यांनी एक तलावही बांधला आहे. शनिवारी सकाळी दाेघेही बराच वेळ बाहेर न आल्यामुळे एका मुलाने खिडकीतून डाेकावून पाहिले असता रक्ताच्या थाराेळ्यात दाेघांचे मृतदेह दिसून आले. त्यानंतर पाेलिसांना कळवताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान घराजवळच घुटमळला. गर्दी असल्याने त्याला माग काढता आला नाही, असे पाेलिसांनी सांगितले. 

महिलेच्या अंगावर दागिने आणि घरातील वस्तू चाेरीला गेल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या दाम्पत्याला दोन मुले असून, ते बाहेरगावी वास्तव्यास आहेत. जमिनीवरून काही नातेवाइकांशी त्यांचा वाद सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई-वडोदरा या महामार्गात त्यांची जागा गेली होती. काही महिन्यांपूर्वी त्याचा घसघशीत माेबदला त्यांना मिळाल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी ही हत्या मालमत्तेच्या वादातून झाली की, चाेरीच्या उद्देशाने, अशा दाेन्ही बाजूंनी तपास सुरू केला आहे.

संशयित ताब्यात

पाेलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याची चाैकशी सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखा, ठाणे यांच्यामार्फत तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिली.
 

Web Title: vajreshwari couple strangled to death and suspect in the custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.