'व्हॅलेंटाइन डे'ला प्रेयसीशी लग्न करायचे होते, टीव्हीवरचा क्राईम शो पाहून रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 21:39 IST2022-01-20T21:38:20+5:302022-01-20T21:39:00+5:30
Robbery Case : पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

'व्हॅलेंटाइन डे'ला प्रेयसीशी लग्न करायचे होते, टीव्हीवरचा क्राईम शो पाहून रचला कट
दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पुरुषाला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी आपल्या प्रेयसीशी लग्न करायचे होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. यासाठी टीव्हीवर क्राईम शो पाहिल्यानंतर त्याने डल्ला मारला आणि चोरी केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
खरं तर, मोहम्मद फहिमुद्दीन यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती की, १८ जानेवारी रोजी त्यांची पत्नी घरी एकटी होती. ती काही वेळाने घराबाहेर पडली आणि परत आली तेव्हा गेटचे कुलूप उघडे होते. कपाटातून ३ लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने व मोबाईल फोन इतका ऐवज गायब होता.
'आई! आम्ही आत्महत्या करतोय', पत्नीसोबत लावून घेतला गळफास, ४ महिन्यांपूर्वी केला होता प्रेमविवाह
१२ वर्षीय मुलगी ऑनलाईन क्लासला होती, शेजाऱ्याने तिला एकटी असल्याचं पाहून घरात घुसून केला
चोरीत सहभागी तरुणाला अटक
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, या घटनेत जवळच्या व्यक्तीचाच हात असल्याचे समोर आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली, २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी एका गुप्तचराच्या मदतीने मोहम्मद जैद नावाच्या २० वर्षीय तरुणाची ओळख पटवली, जो फर्श खाना भागात राहणारा होता.
पोलिसांनी आरोपीला अटक केली
आरोपीला अटक केल्यानंतर त्याने आपल्याला फक्त ८ हजार पगार मिळत असल्याचा खुलासा केला. त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते आणि व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. तो टीव्हीवरील क्राईम शो पाहत असे आणि युट्यूबवर विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे टीव्ही शो पाहिल्यानंतर त्याला घरात चोरी करण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्याने बाजारातून अनेक डझन चाव्या खरेदी केल्या आणि त्यानंतर फर्श खाना परिसरात लाखोंच्या चोरीचा गुन्हा त्याने केला.