मुंबई पोलिसांची मोलाची कामगिरी; नवजात बालकाला नाल्यातून बाहेर काढून दिलं पुर्नजीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 09:43 PM2021-11-17T21:43:14+5:302021-11-17T21:46:36+5:30
Mumbai Police Save Newborn Baby : मुंबई पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नवजात अर्भकाला नाल्यातून सुखरूप बाहेर काढले आणि रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला.
मुंबईत नवजात बालकास पोलिसांनी वाचवल्याची एक घटना समोर आली आहे. घाटकोपरमधील पंतनगर परिसरात एक नवजात अर्भक नाल्यात वाहून जात होते. ते मांजरींनी पाहिले आणि त्यांनी आवाजाने आजूबाजूच्या लोकांना जमा केले. यानंतर जमलेल्या नागरिकांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नवजात अर्भकाला नाल्यातून सुखरूप बाहेर काढले आणि रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला.
मुंबई पोलिसांनी ट्विट करुन या घटनेची माहिती दिली आहे. “एक नवजात अर्भक कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकले गेले असल्याची माहिती पंतनगर निर्भया पथकास मिळाली होती. नाल्याजवळील मांजरींनी ओरडून गोंधळ केल्याने संबंधित नागरिकांच्या नजरेस नाल्यातील बालक पडले होते. बाळाला त्वरित राजावाडी रुग्णालयात नेले असून बाळ आता सुखरूप, सुरक्षित आहे”, अशी माहिती देणारं ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.
एक नवजात अर्भक कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकले गेले असल्याची माहिती पंतनगर निर्भया पथकाला एका हितचिंतकाकडून मिळाली होती.
— Mumbai Police (@MumbaiPolice) November 15, 2021
शेजारच्या मांजरींनी ओरडुन गोंधळ केल्याने ती व्यक्ती सावध झाल्याचे समजले.
बाळाला त्वरित राजावाडी रुग्णालयात नेले असून बाळ आता सुरक्षित आहे.#MumbaiCaseFilespic.twitter.com/TxylValy5S