Shraddha Walker Murder Case : "आम्हाला आफताबचे 70 तुकडे करायचे आहेत कारण त्याने आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 12:28 PM2022-11-29T12:28:31+5:302022-11-29T12:38:26+5:30
Shraddha Walker Murder Case : पोलिसांनी जप्त केलेल्या कारमध्ये हातोडा, तलवार सापडल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनावर सोमवारी (28 नोव्हेंबर) दिल्लीतील रोहिणी येथे हल्ला करण्यात आला. पॉलीग्राफ चाचणीनंतर एफएसएल टीम आफताबला घेऊन बाहेर आली होती. यादरम्यान, काही लोकांच्या जमावाने वाहनावर हल्ला केला. व्हॅनवर हल्ला करणाऱ्या लोकांमध्ये एकाच्या हातात तलवार दिसत होती. त्याने व्हॅनवर तलवारीने वार केले आणि व्हॅनचा दरवाजा उघडला. पण, तेवढ्यात पोलीस तिथे आले.
पोलिसांनी याप्रकरणी निगम गुर्जर या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. गुर्जर याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, "आम्हाला आफताबला कापायचं होतं. आम्ही गुरुग्रामवरून 15 लोक आलो होतो. सर्वजण सकाळीच दिल्लीला आलो. लॅबबाहेर बसून रेकी करत होतो. आफताबचे 70 तुकडे करायचे आहेत, कारण त्याने आमच्या बहिणीचे 35 तुकडे केले. याचाच प्रचंड राग आहे. आफताबची हत्या करूनच परत यायचं होतं. पण पोलिसांनी आम्हाला रोखलं."
तिहार जेलमध्ये 'अशी' गेली आफताबची पहिली रात्र; आरामात झोपला, चेहऱ्यावर नव्हतं टेन्शन अन्...
गुर्जरच्या अन्य साथीदारांचा आता शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या कारमध्ये हातोडा, तलवार सापडल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. वाहनावर हल्ला करताच पोलिसांच्या सतर्कतेमुळे आफताबचा जीव वाचला. यावेळी नाराज जमावाने पोलीस व्हॅनवर दगडफेकही केली. पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणारे लोक हिंदू सेनेचे कार्यकर्ते आहेत. या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन व्हॅन काढली आणि आफताबला सुरक्षित नेले.
तिहार जेलमध्ये आफताब आत्महत्या करू शकतो?, अधिकाऱ्यांना वेगळीच भीती; श्रद्धाबद्दल विचारलं की...
आफताबवर जेलमध्ये करडी नजर ठेवण्यात येत आहे. आफताब सध्या तिहार जेलमध्ये बंद असून तो आत्महत्या करू शकतो अशी भीती पोलिसांना आहे. यामुळे आफताबवर नीट लक्ष ठेवलं जात असल्याचं माहिती समोर आली आहे. आफताब स्वत:ला नुकसान पोहोचवू शकतो अशी कोणतीही गोष्ट त्याच्या जवळ ठेवू नका अशा सूचनाच जेलमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आफताब जेल क्रमांक ४ मध्ये बंदिस्त आहे. त्याचा विक्षिप्त स्वभाव लक्षात जेल प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे. पोलीस कोठडीत आफताब अत्यंत शांत असल्याने पोलिसांना आश्चर्यही वाटत आहे. आफताबच्या कोठडीत दोन कैद्यांना ठेवण्यात आलं असून, त्यांनाही त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. आफताबने चांगली झोप काढली असून त्यांच्याशी गप्पाही मारल्या आहेत. दरम्यान आफताबची पुन्हा एकदा पॉलिग्राफी चाचणी होणार आहे. यानंतर त्याची नार्को चाचणी केली जाईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"