६४ वर्षीय प्रियकराने पैसे दिले नाहीत म्हणून ४० वर्षीय प्रेयसीची घरात घुसून तोडफोड व चोरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 07:50 PM2022-01-21T19:50:10+5:302022-01-21T19:50:44+5:30

१७ वर्षांपासून प्रेमसंबंध व त्यातून झालेला ८ वर्षाचा मुलगा असे नाते असलेल्या ६४ वर्षीय प्रियकराने पैसे दिले नाहीत म्हणून ४० वर्षीय प्रेयसीने घरात घुसून तोडफोड करत १५ हजार रुपये चोरून नेल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे. 

Vandalism and burglary of 40-year-old girlfriend's house as her 64-year-old boyfriend did not pay | ६४ वर्षीय प्रियकराने पैसे दिले नाहीत म्हणून ४० वर्षीय प्रेयसीची घरात घुसून तोडफोड व चोरी 

६४ वर्षीय प्रियकराने पैसे दिले नाहीत म्हणून ४० वर्षीय प्रेयसीची घरात घुसून तोडफोड व चोरी 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - १७ वर्षांपासून प्रेमसंबंध व त्यातून झालेला ८ वर्षाचा मुलगा असे नाते असलेल्या ६४ वर्षीय प्रियकराने पैसे दिले नाहीत म्हणून ४० वर्षीय प्रेयसीने घरात घुसून तोडफोड करत १५ हजार रुपये चोरून नेल्याची घटना भाईंदर मध्ये घडली आहे . 

भाईंदर पोलीस ठाण्यात या बाबत  रतनचंद रायचंद साकरीया (६४) रा. लोकमान्य शॉपिंग सेंटर , महापालिका जवळ , भाईंदर यांच्या फिर्यादी वरून गिता कृष्णा पवार (४०) रा. संकल्प निवारा, गोकुळधाम, गोरेगाव हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादी साकरीया यांच्या म्हणण्या नुसार, त्यांचा वसई पूर्वेला स्टील चा व्यवसाय असून सदर ठिकाणी ते त्यांचा ७२ वर्षीय वृद्ध नोकर अचलाराम पुरोहीत सोबत गेल्या दिड वर्षां पासून राहतात . त्यांची पत्नी , दोन मुली व एक मुलगा असे कुटुंब भाईंदरच्या डीमार्ट जवळ भैरव सृष्टी येथे राहते.   

 गिता पवार सोबत गेल्या १७ वर्षापासुन प्रेमसंबंध असून तिच्या पासून एक ८ वर्षांचा मुलगा आहे . गीता हिने पोटगी मिळावी म्हणून न्यायालयात साकरिया विरुद्ध दावा केला असून त्याचा अजून निर्णय प्रलंबित आहे . तरी देखील साकारिया हे गीताला दरमहा पोटगी रक्कम देत असतात . परंतु गीता हि पैसे , घर आदींची मागणी करून धमकावत असते . १७ जानेवारी रोजी ७ . ३० च्या सुमारास गीता हि साकरीया घरात नसताना आली व नोकरास विचारणा करून शिवीगाळ करू लागली . नोकर पुरोहित घराबाहेर निघून गेले व मालकास कळवले . गिता हिने साकरिया यांना फोन करून घरी तात्काळ न आल्यास रुममधील सामानाची तोडफोड करण्याची धमकी दिली. त्यामुळे ते वसई वरून घरी येण्यास निघाले . रात्री ते घरी पोहचले असता गीता ने घरातील टी.व्ही, फ्रिज आदी फोडले व साकरिया यांचे कपडे फाडून टाकले होते . घरात ठेवलेली १५ हजारांची रोकड सुद्धा तिने नेली होती . 

Web Title: Vandalism and burglary of 40-year-old girlfriend's house as her 64-year-old boyfriend did not pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.