फटाके फोडण्यावरून भाईंदरच्या राई गावात तोडफोड व हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 06:55 PM2021-11-09T18:55:20+5:302021-11-09T18:56:06+5:30
भाईंदरच्या राई गावात फटाके फोडण्यावरून दोन कुटुंबात हाणामारी व तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदरच्या राई गावात फटाके फोडण्यावरून दोन कुटुंबात हाणामारी व तोडफोड केल्या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबाने एकमेकां विरुद्ध फिर्याद देऊन सोमवारी गुन्हा दाखल केला आहे .
राई गावातील हर्ष भरत पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार , तो व शेजारी रहाणारा प्रिंन्स गुणेश म्हात्रे व ईतर मुले फटाके फोडत होते . त्यावेळी हर्षने प्रिन्सला माझ्या जवळ फटाके का फोडतो असे विचारल्याने झटपट होऊन प्रिन्सने हर्षला चावत शिवीगाळ , मारहाण केली . त्या नंतर पुन्हा प्रिन्स सह त्याचे वडील गुणेश व एक मित्र हर्षच्या घरात शिरले व घरातील फिशटॅन्क फोडली आणि मोबाईल फोडत हर्ष व त्याच्या बहिणीस मारहाण , शिवीगाळ केली . या प्रकरणी प्रिन्स , त्याचे वडील गुणेश व एका मित्रा विरुद्ध भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
तर गुणेश गोवर्धन म्हात्रे (४९) याने दिलेल्या फिर्यादी वरून हर्ष व त्याचे वडील भरत पाटील वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . त्यात हर्ष हा प्रिन्स जवळ फटाके फोडत असल्याने भांडण त्याने तोंडाला चावा घेत शिवीगाळ व मारहाण केली . त्याचा जाब विचारण्यासाठी हर्षच्या घरी गेलो असता त्याने खांद्यावर लाकडी दांडक्याने मारले . हर्ष व त्याचे आई -वडीलने शिवीगाळी करुन जीवे मारायची धमकी दिली.