पिंपरी चिंचवडमध्ये तोडफोडीने रुपीनगर हादरले; २५ ते ३० गाड्यांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 02:26 PM2023-03-11T14:26:43+5:302023-03-11T14:45:39+5:30
घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड - रुपीनगर परिसरातील सरस्वती हौसिंग सोसायटी मध्ये अज्ञाताकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे
पुणे/निगडी : रुपीनगर परिसरातील एकाच सोसायटीतील २५ ते ३० चारचाकी गाड्यांची अज्ञाताने मोडतोड करून गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना शनिवारी पहाटे ३ वाजून ४५ वाजता पहाटे घडली. शनिवारी पहाटे गाडयांच्या तोडफोडीचा आवाज आल्याने नागरिक घराबाहेर आले तेव्हा ही घटना उघडकीस आल्यानंतर रुपीनगर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड - रुपीनगर परिसरातील सरस्वती हौसिंग सोसायटी मध्ये अज्ञाताकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. घराबाहेर रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी, दुचाकी, तीनचाकी अश्या तब्बल २५ ते ३० वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तसेच गाड्यांची मोडतोडही केली आहे. या घटनेमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञाताने वाहनांच्या काचा फोडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
तोडफोड सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू -गाड्यांच्या तोडफोड प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. काही तरुणांनी दारूच्या नशेत हे कृत्य केले असावे, असा पोलिसांना संशय आहे. संबंधिताचा तातडीने शोध लावून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा विश्वास चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी व्यक्त केला आहे.