'पत्नीला मारल्यावर दारुच्या धंद्यात भरभराटी येईल', मांत्रिकाच्या सांगण्यावरून कुटुंबाला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 06:01 PM2024-11-05T18:01:05+5:302024-11-05T18:01:16+5:30

एका दारु व्यापाऱ्याने मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नी आणि तीन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

Varanasi Murder: 'Liquor businessman killed wife and three child | 'पत्नीला मारल्यावर दारुच्या धंद्यात भरभराटी येईल', मांत्रिकाच्या सांगण्यावरून कुटुंबाला संपवलं

'पत्नीला मारल्यावर दारुच्या धंद्यात भरभराटी येईल', मांत्रिकाच्या सांगण्यावरून कुटुंबाला संपवलं

Varanasi Murder:उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मांत्रिकाच्या सांगण्यावरुन एका मद्य व्यापाऱ्याने पत्नी आणि तीन मुलांची हत्या केली अन् काही वेळानंतर स्वतःवरही गोळी झाडून आयुष्य संपवले. राजेंद्र गुप्ता, असे या व्यक्तीचे नाव असून, एका कुटुंबातील चौघांच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घटनेने पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. 

मांत्रिकाचा सल्ला ऐकला
पोलिसांच्या तपासात एका मांत्रिकाची एंट्री झाली आहे. राजेंद्र गुप्ताने मांत्रिकाच्या सांगण्यावरुनच हा जघन्य गुन्हा केल्याचे उघड झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू व्यावसायिक राजेंद्र गुप्ता याच्याकडे पैशांची कमतरता नव्हती. एका प्रॉपर्टीच्या भाड्यातून त्याला दरमहा 5 लाखांहून अधिक रक्कम मिळत होती. पण, गेल्या वर्ष भरापासून त्याचा अवैध दारुचा धंदा चांगला चालत नव्हता. यामुळेच तो अनेक दिवसांपासून चिंतेत होता. या कारणामुळे तो जवळपास वर्षभर आपल्या घरीही आला नव्हता. हा दारुचा व्यवसाय सुधारण्यासाठी त्याने एका मांत्रिकाशी संपर्क साधला. 

पत्नी अन् तीन मुलांना मारले
मांत्रिकाने व्यवसायात पत्नीमुळे अडथळा येत असून, जोपर्यंत पत्नी जीवंत आहे, तोपर्यंत व्यवसाय वाढू शकणार नसल्याचे सांगितले. त्याच्या या सल्ल्याने दारू व्यावसायिक राजेंद्र गुप्ता ठार वेडा झाला. यानंतर तो जवळपास वर्षभरानंतर दिवाळीच्या दिवशी आपल्या घरी परतला आणि पत्नी, मुलांसोबत दिवाळी साजरी केली. वर्षभरानंतर तो घरी परतल्याने कुटुंबीयही खूप आनंदी होते. पण, मंगळवारी सकाळी संधी पाहून राजेंद्र गुप्ता याने 45 वर्षीय पत्नी नीतू गुप्ता, 25 वर्षीय मुलगा नमन, 17 वर्षीय मुलगी गौरी आणि 15 वर्षीय लहान मुलगा छोटू, यांनाही मारले. 

अवैध संबंधांचा संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत अनैतिक संबंधाचा अँगलही समोर आला आहे. तपासादरम्यान राजेंद्र गुप्ता याची पहिली पत्नी 90च्या दशकात त्याला सोडून गेल्याचे समोर आले आहे. यानंतर राजेंद्र गुप्ताने वडील, भाऊ, मेव्हणा आणि सिक्युरिटी गार्डची हत्या केली. या प्रकरणात तो तुरुंगात गेला होता. तुरुंगातून बाहेर येताच त्याने दुसरे लग्न केले आणि या लग्नातून त्याला दोन मुले आणि एक मुलगी झाली. दरम्यान, राजेंद्र गुप्ता एका महिलेच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या महिलेशी त्याला लग्न करायचे होते, पण पत्नी संबंधात अडथळा ठरत होती.
 

Web Title: Varanasi Murder: 'Liquor businessman killed wife and three child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.