अश्लील फोटो काढून मुलींकडून पैसे उकळण्याऱ्या भामट्याला वसई पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 11:35 PM2022-01-30T23:35:54+5:302022-01-30T23:37:16+5:30

आरोपी पुरता बेकार असल्याचे वसई पोलिस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी लोकमतला सांगितले.

vasai police arrest vagrant for taking obscene photos and extorting money from girls | अश्लील फोटो काढून मुलींकडून पैसे उकळण्याऱ्या भामट्याला वसई पोलिसांकडून अटक

अश्लील फोटो काढून मुलींकडून पैसे उकळण्याऱ्या भामट्याला वसई पोलिसांकडून अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई: सोशल मीडियाच्या व्हॉटसएपवर मुलीचे अश्लील फोटो काढून प्रसंगी शरीर सुख व त्याच मुलींकडुन पैसे उकळण्याऱ्या भामट्याला वसई पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अबू सलीम अन्सारी रा. वसई असे या भामट्या आरोपीचे नाव असून, तो पुरता बेकार असल्याचे वसई पोलिस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी लोकमतला सांगितले

त्याच्या या विविध कृत्यांविरोधात वसई पोलिसांत पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार, पोलिसांच्या विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल केला आहे. वसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अबू अन्सारी या भामट्याने इंस्टाग्रामवर एका मुलीच्या नावाने बोगस खाते उघडून आपण फेशन मॉडेल असल्याचे प्रोफाइल तयार केलं होतं, तर त्याच खात्यावरून त्यांने बऱ्याच मुलींना मैत्रीसाठी प्रसिद्ध कंपनीच्या जाहिरातीचे आमिष दाखवून मुलींचे अश्लील फोटोही घेतले होते.

दरम्यान आरोपी इंस्टाग्रामवर मुलीची माहिती घेतल्यानंतर त्या मुलींना फोन करून व्हाट्सअपवर तिला अंगावरील कपडे काढून त्यांचे फोटो सेव्ह करायचा आणि मग ते फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करण्याची धमकी देऊन मुलींकडून पैशाची व शरीर सुखाची मागणी ही करायचा परिणामी वसईतील एका पीडित मुलीच्या तक्रारीवरून वसई पोलिसांनी आरोपी अबू अन्सारी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

विशेष म्हणजे वसई पोलिसांनी या आरोपींला रंगेहाथ ताब्यात घेण्यासाठी आपल्याच पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल सुनील मावळकर  यांना कॅब गाडीचे ड्रायव्हर बनवून त्या पीडित मुलीसोबत ठरल्याप्रमाणे पाठवले आणि अखेर त्या आरोपींला पोलीस पथकाने  मोठ्या शिताफीने अटकही केली
धक्कादायक प्रकार म्हणजे या आरोपीने अशा प्रकारच्या कृत्यात जवळपास आठ मुलींना फसवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

परंतु या फसलेल्या मुलीपैकी अद्यप कोणीही आरोपी अबू अन्सारी विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आलेले नाही याउलट फसवणूक झालेल्या मुलींनी बिनधास्तपणे वसई पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आवाहन वसई पोलिस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी केले आहे.
 

Web Title: vasai police arrest vagrant for taking obscene photos and extorting money from girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.