२७ वर्षीय तरुणाकडून वास्को पोलीसांनी रंगेहात पकडला १ कीलो २०० ग्राम गांजा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 10:34 PM2021-04-06T22:34:35+5:302021-04-06T22:34:55+5:30
पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून त्याला केली गजाआड
वास्को: दक्षिण गोव्यात असलेल्या वास्को शहरातील थोड्याच अंतरावरील देऊसोवाडो, चिखली येथे एक तरुण गांजा अमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची पूर्व माहीती वास्को पोलीसांना मिळताच त्यांनी मंगळवारी (दि.६) संध्याकाळी येथे सापळा रचून प्रबीर प्रोवत बेपारी या तरुणाला १ कीलो २०० ग्राम गांजासहीत रंगेहात पकडला. प्रबीरकडून जप्त केलेल्या गांजाची कींमत १ लाख २० हजार रुपयांच्या आसपास असून याप्रकरणात त्याच्याबरोबर अन्य एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहीती पोलीसांना प्राप्त झाल्याने त्या व्यक्तीशी पोचण्यासाठी पोलीस उचित पावले उचलत असल्याची माहीती सूत्रांनी दिली.
वास्को पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी संध्याकाळी ४.५० ते ७ यादरम्यान सापळा रचण्याबरोबरच धाड मारून प्रबीर याला गांजा अमली पदार्थासहीत रंगेहात पकडला. एक तरुण चिखली भागात मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन एका व्यक्तीला विकण्यासाठी येणार असल्याची माहीती पोलीसांना मिळताच त्याला गजाआड करण्यासाठी पोलीसांनी तेथे सापळा रचला. ही कारवाई करण्यावेळी येथे मुरगावच्या मामलेदारांनी उपस्थिती लावली होती अशी माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली.
सापळा रचल्यानंतर तो तरुण गांजा घेऊन आल्याची माहीती प्राप्त होताच पोलीस उपनिरीक्षक प्रमीला फर्नांडीस व इतर पोलीस पथकाने तेथे धाड मारून त्याला तरुणाला ताब्यात घेतला. नंतर त्याची तपासणी केली असता त्याच्याकडून १ कीलो २०० ग्राम गांजा अमली पदार्थ सापडला. गांजासहीत रंगेहात पकडलेल्या त्या तरुणाशी पोलीसांनी अधिक चौकशी केली असता त्याचे नाव प्रबीर बेपारी (वय २७) असे असल्याचे स्पष्ट होऊन तो झुअरीनगर भागात राहत असल्याचे उघड झाले. गांजा प्रकरणात पकडलेला प्रबीर हा सूत्रार म्हणून काम करत असून तो मूळ पच्छीम बंगाल येथील रहीवाशी असल्याचे चौकशीवेळी स्पष्ट झाले.
पोलीस उपनिरीक्षक प्रमीला फर्नांडीस व इतर पोलीसांना धाड मारून प्रबीर याला गांजासहीत रंगेहात पकडल्यानंतर उपनिरीक्षक रितेश तारी यांनी याप्रकरणात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. या गांजा प्रकरणात अन्य एका इसमाचा हात असण्याची माहीती पोलीसांना चौकशीवेळी प्राप्त झालेली असून पोलीस त्या मार्गानेही तपास करित आहेत.