पिंपरीत वाहनाची तोडफोड; सात जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 14:47 IST2018-10-26T14:46:29+5:302018-10-26T14:47:43+5:30
वाहनाची व पत्राशेडची तोडफोड करत परिसरात दहशत माजविल्याविल्याप्रकरणी सात जणांच्या टोळक्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरीत वाहनाची तोडफोड; सात जणांना अटक
पिंपरी : वाहनाची व पत्राशेडची तोडफोड करत परिसरात दहशत माजविल्याविल्याप्रकरणी सात जणांच्या टोळक्याला पिंपरी पोलिसांनीअटक केली आहे. ही घटना गुरुवारी रात्री एकच्या सुमारास चिंचवड, रामनगर येथील राम मंदीरासमोरील महापालिकेच्या मोकळया मैदानात घडली.
अभिजीत जोशी (वय ३०), करण मोहिते (वय २३), अजित आखाडे (वय २७), विनोद विलास घोडके, गोपाळ नवनाथ जाधव (वय २२), शकील गफार अंगारके (वय २१), धिरज संजय बिराजदार (वय २०, सर्व रा. लालटोपीनगर, मोरवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी युवराज माने (वय ३६, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपींनी लोखंडी कोयते व दगडांनी माने यांच्या मोटारीची तसेच पत्र्याच्या शेडची तोडफोड केली. तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर कशाचा आवाज येतोय हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी दारे-खिडक्या उघडले. त्यावेळी आखाडे याने लोखंडी कोयता हवेत फिरवून आमच्यामध्ये कोणी यायचे नाही, नाहीतर खल्लास करुन टाकीन असे म्हणत परिसरात दहशत पसरविली. दरम्यान, माने त्यांच्याकडे गेले तसेच अभिजीत जोशी यास मोटार फोडण्याचे कारण विचारले असता तो कोयता घेवून माने यांच्या अंगावर धावून आला. त्यांना शिवीगाळ करीत आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.