वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक; पाच दुचाकी हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 20:50 IST2021-06-10T20:29:01+5:302021-06-10T20:50:20+5:30
Theft Arrested : याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक; पाच दुचाकी हस्तगत
कल्याण: एकिकडे वाहनचोरीचे सत्र कल्याण डोंबिवलीत सुरू असताना रस्त्यावर पार्क केलेली मोटरसायकल मोठया शिताफीने चोरून नेणा-या सराईत चोरटयाला महात्मा फुले चौक पोलीसांनी अटक केली आहे. आनंद उर्फ लल्ला कलपनाथ सोनी वय 21 रा. हाजीमलंग रोड असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 5 दुचाकी असा 1 लाख 45 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
कल्याणच्या आग्रा रोड येथे राहणारे तुषार सूचक यांची पार्क असलेली मोटरसायकल गेल्या वर्षी 6 ऑगस्ट 2020 ला सकाळी महावीर शॉपिंग सेंटर समोरील रोडवरून चोरीला गेली होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा तपास करताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहीतीनुसार हाजीमलंग रोड येथून आनंदला अटक करण्यात आली त्याच्याकडे तुषार यांची दुचाकी मिळून आली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन, मानपाडा, बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीसह मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी 1 अशा 5 दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली.