दुकानातून १० कोटींचे सोनं-हिरे लंपास; तरुणाची शक्कल पाहून सारेच गार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 02:57 PM2021-12-21T14:57:18+5:302021-12-21T15:00:35+5:30
Tamilnadu Crime News : या चोरीबाबत पोलिसांच्या मनात अनेक प्रश्न होते. जसे की, कुणीही अलार्म का वाजवू शकलं नाही? कुणालाही काही संशयास्पद काहीच कसं आढळलं नाही?
Tamilnadu Crime News : तामिळनाडू पोलिसांनी वेल्लोरमध्ये एक ज्वेलरी दुकानातून १५ किलो सोनं लुटणाऱ्या चोराला अटक केली आहे. पोलिसांना तेव्हा धक्का बसला जेव्हा त्यांना समजलं की, चोराने YouTube वर व्हिडीओ बघून दरोडा टाकण्याचा प्लॅन केला होता. पोलिसांनी पाच दिवसांच्या कठोर मेहनतीनंतर वेल्लोरमध्ये ज्वेलरी दुकान लुटणाऱ्या आरोपीला अटक केली.
१५ डिसेंबरला अलुक्कास ज्वेलरी शॉपमध्ये लूट झाल्याची सूचना मिळाली होती. १५ किलो सोन्याचे दागिने चोरी गेले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती चेहऱ्यावर मुखवटा लावून दिसला होता. तो स्प्रे पेंटचा वापर करून सीसीटीव्ही कॅमेराचं रेकॉर्डींग रोखण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यानंतर त्याने ही चोरी केली.
या चोरीबाबत पोलिसांच्या मनात अनेक प्रश्न होते. जसे की, कुणीही अलार्म का वाजवू शकलं नाही? कुणालाही काही संशयास्पद काहीच कसं आढळलं नाही? पोलिसांनी साधारण २०० सीसीटीव्ही रेकॉर्डींग पाहिले. सोमवारी पोलिसांना त्यांच्या पाच दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळालं. आरोपी कुचिपलयम गावातील २२ वर्षीय तीखाराम आहे.
चौकशीतून जे समोर आलं ते पाहून पोलिसही हैराण झाले. तीखारामने यूट्यूब व्हिडीओ बघून चोरीचा प्लान केला होता. प्रारंभिक चौकशीतून समोर आलं की, तीखारामने ज्वेलरी दुकानाच्या भींतीला छिद्र पाडण्यासाठी १० दिवसांचा वेळ घेतला. जेणेकरून कोणताही आवाज होऊ नये.
त्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी आणि सीसीटीव्ही ब्लॉक करण्याची आयडिया यूट्यूबवर पाहिली. तीखारामने सोनं वितळवण्यासाठी काही मशीन्सही विकत घेतल्या होत्या. त्या त्याने ओडुकाथुर स्मशानात लपवल्या होत्या. मात्र, इतकं सगळं करूनही तीखाराम पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच. त्याला लवकर श्रीमंत व्हायचं होतं म्हणून त्याने ही चोरी केली. त्याच्याकडून पोलिसांनी १० कोटी रूपये किंमतीं सोनं आणि काही हिरे ताब्यात घेतले.