नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लाचखोर पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 08:00 PM2019-01-01T20:00:04+5:302019-01-01T20:01:35+5:30

वाईन शॉप मालकाकडून २२ लाखांची लाच घेताना अंधेरी एमआयडीसी येथील गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक 10 चे  पोलीस निरीक्षक आनंद सिताराम भोईर(४३) याला एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. 

 On the very first day of the new year, the briber police officer arrested by ACB | नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लाचखोर पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात  

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लाचखोर पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात  

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक आनंद सिताराम भोईर(४३) याला एसीबीकडून अटक गुन्ह्याचे तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक आनंद भोईर कामकाज पाहत होते.पोलीस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. 

मुंबई - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी २२ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस अधिकारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. वाईन शॉप मालकाकडून २२ लाखांची लाच घेताना अंधेरी एमआयडीसी येथील गुन्हे प्रकटीकरण शाखा क्रमांक 10 चे  पोलीस निरीक्षक आनंद सिताराम भोईर(४३) याला एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. 

स्थानिक पोलीस ठाण्यात कलम ६५, ४१, ४३, ९०, १०८ महाराष्ट्र कायद्यान्वये २०१८ साली गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक आनंद भोईर कामकाज पाहत होते. तपासादरम्यान पाहिजे आरोपी असलेल्या वाईन शॉप मालकाविरोधात दाखल गुन्ह्यात अटकेची कारवाई न करण्यासाठी 25 लाखाची मागणी भोईरने केली होती. तडजोडीअंती लाचेची रक्कम २२ लाख इतकी ठरली. त्यानंतर वाईन शॉप मालकाने एसीबीला याबाबत माहिती दिली. एसीबीने प्रकरणाची शहनिशा करून आज सापळा रचला. सापळ्यादरम्यान खाजगी वाहनात चालकासह भोईरला 22 लाख  स्विकारताना रंगेहाथ पोलिसांनी अटक केली आहे. 



 

Web Title:  On the very first day of the new year, the briber police officer arrested by ACB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.