वासनेची शिकार! ४ वर्षीय चिमुकलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरुणाने केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 18:25 IST2021-07-18T18:24:59+5:302021-07-18T18:25:40+5:30
Rape Case in Mumbai :याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

वासनेची शिकार! ४ वर्षीय चिमुकलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून २८ वर्षीय तरुणाने केला बलात्कार
घराजवळ राहणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणाला एका ४ वर्षांच्या चिमुकलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. पश्चिम उपनगरात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आली आहे. आरोपी तरुणाने पीडित मुलीला आईस्क्रीम देण्याचा आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पीडित मुलगी आपल्या घराजवळ खेळत असताना ही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी आणि पीडित दोघेही पश्चिम उपनगरात एकाच भागात राहतात. जवळच आरोपीचे एक स्टॉल आहे, मुलगी एकटी खेळत असल्याचे पाहून आरोपीने सोबत नेले. साकी नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बलवंत देशमुख म्हणाले की, पीडित मुलीची आरोपीसोबत ओळख असल्याने ती तिच्याबरोबर गेली.
पीडित मुलगी पुन्हा घरी आल्यानंतर या घटनेबाबत घरच्यांना माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने साकीनाका पोलीस ठाण्यात २८ वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल देत साकीनाका पोलीसांनी अवघ्या काही तासांतचं आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहे.