Video : एटीएम लुटायला गेले अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 04:48 PM2018-12-03T16:48:54+5:302018-12-03T17:00:38+5:30
हे एटीएम लुटण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिघे चोरटे आले होते. या तिघांनि बंदुकीचा धाक दाखवून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला होता. या तिघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई - कांदिवली परिसरात लोखंडवाला परिसरात विजया बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम लुटण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिघे चोरटे आले होते. या तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला होता. या तिघांना कांदिवलीतील समता नगर पोलिसांनी अटक केली आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस तीन दिवस बँकांना सलग सुट्ट्या होत्या. त्यामुळे एटीएममध्ये रोख रक्कम जास्त असण्याचा चोरट्यांचा अंदाज होता. मात्र, हा अंदाज पुरता फसला आहे. दोन दिवसांपासून हे आरोपी थांबले होते आणि एटीएमवर पाळत ठेवून होते. मात्र बंदुकीचा धाक दाखवून एटीएम लुटीच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांपैकी एकाला उत्तर प्रदेशातून पकडण्यात आले. तर दोघांना सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने जेरबंद करण्यात आले आहे. अटक केलेल्या तीन चोरट्यांनी नावं अँथोनी मनेजेस, शिवम मिश्रा आणि मोहम्मद मोजीम अशी आहेत. या आरोपींकडून दोन रिव्हॉल्वर आणि एक अॅक्टीव्हा गाडीही पोलिसांनी हस्तगत केली. ही अॅक्टीव्हाही चोरीची असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.