Video : बर्निंग बाईक! ठाण्यात अज्ञातांनी पेटवल्या ९ मोटारसायकल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 15:47 IST2018-12-06T15:43:28+5:302018-12-06T15:47:09+5:30
अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. हे कृत्य नेमकं कोणी व कशासाठी केलं हे अद्याप कळू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Video : बर्निंग बाईक! ठाण्यात अज्ञातांनी पेटवल्या ९ मोटारसायकल
ठळक मुद्देनऊ मोटरसायकल पेटवून दिल्याने परिसरात खळबळ उडालीघटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणलीपहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली
ठाणे - पाचपखाडी भागात आज पहाटे साडेतीनच्या सुमारास अज्ञात इसमांनी नऊ मोटरसायकल पेटवून दिल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. हे कृत्य नेमकं कोणी व कशासाठी केलं हे अद्याप कळू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. कौशल्या हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मोटरसायकली अज्ञातांनी आग लावून पेटवून दिल्या. आगीत सर्वच गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सीसीटीव्हीच्या मदतीने सुरू केला आहे.