Video : लोअर परळ ब्रिजवर कारने अचानक युटर्न घेतल्याने झाला मोठा अपघात; दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 10:01 PM2021-09-30T22:01:10+5:302021-09-30T22:02:21+5:30
Accident : याप्रकरणी एन एम जोशी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बुधवारी (29 सप्टेंबर) रात्री १०.५० वाजताच्या सुमारास लोअर परळ येथील सेनापती बापट मार्ग येथील फिनिक्स मॉलचे समोरील ब्रीजवर फिनिक्स मॉल समोर दादर कडुन रखांगी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने अचानक यु टर्न घेतल्याने रखांगी चौकाकडून दादरकडे जाणारे दुचाकीवरील दोघे खाली कोसळले. यावेळी दुचाकीवर असलेल्या दोन निष्पांचा बळी गेला. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत मोटार सायकल (apache) वरील २६ वर्षीय कृष्णा कुराडकर आणि भावेश संघवी (२५) यांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात मोटार सायकल (apache ) वरील भावेश संघवी, 25 वर्ष, रा. भटवाडी, घाटकोपर (प) आणि कृष्णा कुराडकर, वय 26 वर्ष, रा. चेंबूर यांची दुचाकी कारला धडकून ते खाली पडून विरुद्ध दिशेने म्हणजेच दादरकडून येणाऱ्या मोटार सायकल ( access) ला धडकले. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी एकजण दाखलपुर्व मृत तर दुसरा उपचारादरम्यान मयत घोषित केले. दुसर्रा मोटार सायकल (access) वरील इसम अशफाक मुलतानी हा किरकोळ जखमी झाला आहे. कारचालक दादरच्या दिशेने पळून गेला असून कारचा नंबर मिळालेला नाही. CCTV फुटेजवरुन कारचा शोध सुरु आहे, अशी माहिती एन एम जोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी माहिती दिली. याप्रकरणी एन एम जोशी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोअर परळच्या पश्चिमेकडील ब्रिजवर घडली. कारचालकाने कार सुरु असताना अचानक तितक्याच वेगाने ब्रिजवरुन युटर्न घेतला. यावेळी दुचाकीवर असलेल्या दोन निष्पांचा बळी गेला. pic.twitter.com/DOC2R9WowJ
— Lokmat (@MiLOKMAT) September 30, 2021