Video :Coronavirus Lockdown : पाकिस्तानात सामूहिक नमाजास रोखल्याने पोलिसांवर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 10:48 PM2020-04-04T22:48:23+5:302020-04-04T22:50:53+5:30
Coronavirus Lockdown : पोलिसांनी मज्जाव करताच जमावाने पोलिसांवर हल्ला केला.
कराची - पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा वाढत कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. नंतर लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करत मुस्लीम बांधव शुक्रवारी सामूहिक नमाज अदा करण्यासाठी जमले होते. पोलिसांनी मज्जाव करताच जमावाने पोलिसांवर हल्ला केला.
लॉकडाऊन आणि जमावबंदीच्या नियम मोडून नमाज अदा करण्यात येत होता. दरम्यान पाकिस्तानमधील पोलिसांनी मुस्लीम बांधवांना रोखलं. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली आणि संतप्त जमावानं पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांकडे घटनास्थळी मनुष्यबळ कमी असल्यानं पोलिसांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा थरारक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 2458 प्रकरणं समोर आल्या आहेत.
#WATCH Pakistan: Locals in Karachi's Liaquatabad area pelted stones and chased away a police van amid the lockdown, yesterday. pic.twitter.com/OcqTX4riEI
— ANI (@ANI) April 4, 2020