Video : खळबळजनक! भाजपाच्या आमदारांनी कुख्यात गुंड विकास दुबेची केली मदत, चौकशीचा व्हिडिओ उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 08:17 PM2020-07-06T20:17:13+5:302020-07-06T20:21:13+5:30
दुबेविरोधातील फौजदारी खटल्यांमध्ये नेत्यांनी बचावासाठी जोरदार प्रयत्न केले असल्याचा दावा दुबेने केला आहे.
लखनऊ - कानपूरच्या बिकरू गावात ८ पोलिसांची हत्या करणारा आरोपी विकास दुबे अद्याप पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. अशी भीती व्यक्त केली जात आहे की, विकासने नेपाळ किंवा मध्य प्रदेशच्या दरीत आश्रय घेतला आहे. दरम्यान २००६ आणि २०१७ मधील त्याचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. दोन्ही व्हिडिओंमध्ये विकास दुबे आपल्या राजकीय संबंधांची साक्ष देताना दिसत आहेत. दुबेविरोधातील फौजदारी खटल्यांमध्ये नेत्यांनी बचावासाठी जोरदार प्रयत्न केले असल्याचा दावा दुबेने केला आहे.
हा व्हिडिओ २०१७ सालचा आहे. विकास दुबेला एसटीएफने लखनऊ येथून अटक केली. त्यानंतर त्याच्यावर शस्त्र कायदा लागू करण्यात आला. एसटीएफने त्याच्यावर एका हत्येबाबत चौकशी केली. त्यात विकासने सांगितले की, त्याच्या हत्येच्या कटात ही नावं जोडली गेली. त्यामुळे भाजपचे तत्कालीन आमदार भगवती सागर आणि अभिजित सांगा यांनी त्यांचा बचाव केला. विकासने ब्लॉक प्रमुख राजेश कमल, जिल्हा पंचायत अध्यक्ष गुडन कटियार यांची नावेही घेतली. या नेत्यांशी त्यांचे राजकीय संबंध असल्याचे विकास यांनी म्हटले आहे. तथापि, विकासाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी विकासाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले आहे. २०१७ मध्ये अभिजीत सांगा आणि भगवती सागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
विकास दुबेने २०१७ मध्ये पोलीस चौकशीदरम्यान हा दावा केला होता. मात्र, दोन्ही आमदारांनी त्याला नकार दिला आहे. विकास हा कुख्यात गुन्हेगार असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे आणि त्याने एसटीएफची कारवाई टाळण्यासाठी सत्ताधारी आमदारांची नावे वापरली आहेत. आमदार अभिजीत सांगा यांनी विकास दुबे याच्याशी कोणताही संबंधास नकार दिला आहे. ते म्हणाले, कानपूरमधील माझा मतदारसंघ बिठूर असून जवळील खेड्यांमधील लोक मदतीसाठी माझ्याकडे येतात. खरं तर, विकास दुबे इतर पक्षांना पाठिंबा देत असलेल्या प्रकरणांमध्ये मी अनेकदा कारवाई करण्याची शिफारस केली आहे. विकास दुबे हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांची नावे वापरत असत, असे सांगा सांगतात. त्याचवेळी बिल्हौरचे भाजप आमदार भगवती सागर म्हणाले की, दुबे याच्याविरोधात कोणत्याही परिस्थितीत आपण कोणतीही मदत केलेली नाही. त्यांची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मी त्याविरोधात गुन्हा देखील दाखल करेन. दोन्ही आमदारांनी व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी केली आहे. असे वृत्त दैनिक भास्करने दिले आहे.
#VikasDubey claims that he was in touch with 2 BJP MLAs. pic.twitter.com/hr2d9sY7aa
— Mahua Moitra Fans (@MahuaMoitraFans) July 6, 2020
अन्य महत्वाच्या बातम्या...
जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव
साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ
कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप
कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले; घरी बोलावून चौघांनी अब्रू लुटली
Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल
विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस