Video : घाटकोपर हिरे व्यापारी हत्याकांड : सचिन पवारशी आता माझा संबंध नाही; प्रकाश मेहतांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 06:53 PM2018-12-08T18:53:52+5:302018-12-08T18:55:43+5:30
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे काम केलेल्या व्यक्तीला अटक झाल्याने राजकीय आणि व्यवसायिक वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मात्र सचिन पवारशी माझा आता कुठलाच संबंध नाही असा सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल करून प्रकाश मेहतांनी खुलासा केला आहे.
मुंबई - घाटकोपर येथील हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्याप्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहाय्यक सचिन पवार पंतनगर पोलिसांनी आजअटक केली आहे. ७० हजार रुपयांच्या वादावरून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पवारला गुवाहाटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ही देखील होती. मात्र, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे काम केलेल्या व्यक्तीला अटक झाल्याने राजकीय आणि व्यवसायिक वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मात्र सचिन पवारशी माझा आता कुठलाच संबंध नाही असा सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल करून प्रकाश मेहतांनी खुलासा केला आहे.
सचिन पवार याचे घाटकोपर पूर्व परिसरात मोठं प्रस्थ आहे. प्रकाश मेहता यांनी व्हिडीओद्वारे माझ्याकडे २००४ ते २००९ पर्यंत सचिन पवार स्वीय सहाय्यकाचे काम करत होता. त्यानंतर २०११ आणि २०१२ दरम्यान पालिका निवडणुकीत त्याला तिकीट न मिळाल्याने सचिन स्वतंत्र्यपणे अपक्ष म्हणून निवडणुकीस उभा राहिला होता. त्यानंतर त्याने स्वीय सहाय्यक म्हणून काम सोडले. माझा आता त्याच्याशी काहीही संबंध नाही अशी माहिती मेहता यांनी दिली. दरम्यानच्या काळात त्याची पत्नी साक्षी पवारने देखील पालिका निवडणूक लढवली आहे. तसेच व्यावसायिक राजेश्वर उदानी यांच्या हत्येबाबत खेद व्यक्त करून मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास असून ते निपक्षपातीपणे तपास करतील. भाजपा पक्ष कोणत्याही आरोपीला पाठीशी घालणार नाही असे पुढे मेहता म्हणाले.
घाटकोपर हिरे व्यापारी हत्याकांड : कॉल डिटेल्समधून उलगडला हत्येचा कट; आरोपीने केले १३ वेळा फोन