अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा वाढदिवस साजरा करताना व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 17:34 IST2021-01-13T17:33:31+5:302021-01-13T17:34:29+5:30
Chhota Rajan's Birthday Celebration : व्हिडीओ कधीचा याबाबत साशंकता

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा वाढदिवस साजरा करताना व्हिडीओ व्हायरल
कल्याण - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या वाढदिवस साजरा करताना व्हीडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे. हे त्यातून स्पष्ट होत नाही. त्यामुळे हा व्हिडीओ जुना आहे की आताचा याबाबत साशंकता आहे.
छोटा राजनचा वाढदिवस हा 5 डिसेंबर रोजी असतो. मात्र त्याचे सर्व समर्थक त्याचा वाढदिवस 13 जानेवारी रोजी साजरा करतात. आज 13 जानेवारी आाहे. छोटा राजनचे समर्थक केक कापत आहे. केकवर भारताचा नकाशा असून त्यावर छोटा राजनचा फोटो आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला दीपक सपके हा व्हीडीओमध्ये दिसून येत आहे. छोटा राजनला गुन्हेगारी जगतात नाना या नावाने संबोधले जाते. व्हिडीओवर स्ट्रीप येते ती ‘नानासाहेबांचा वाढदिवस’ अशी आहे. विशेष म्हणजे पुण्यातील मुळशी पॅटर्नवर मुळशी पॅटर्न हा चित्रपट मराठीत बराच गाजला. त्यातील ‘भाईचा बड्डे’ हे गाणे या व्हिडीओमध्ये वाजताना दिसत आहे. हा व्हिडीओ जुना की नवा या विषयी सुस्पष्टता नसली तरी हा व्हीडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.