मास्क शिवाय स्कूटी चालवणाऱ्या महिलेला थांबवल्याने सिविल डिफेंस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ अन् मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 10:10 PM2021-08-09T22:10:07+5:302021-08-09T22:10:42+5:30

A woman driving a Scooty without a mask : या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात महिला नागरी संरक्षण कर्मचारी आणि सहकाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ करत आहेत.

Video goes viral after a woman driving a Scooty without a mask was stopped, abusing and beating civil defense personnel | मास्क शिवाय स्कूटी चालवणाऱ्या महिलेला थांबवल्याने सिविल डिफेंस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ अन् मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

मास्क शिवाय स्कूटी चालवणाऱ्या महिलेला थांबवल्याने सिविल डिफेंस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ अन् मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

Next
ठळक मुद्देआश्चर्याची गोष्ट म्हणजे, घटनास्थळी असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या महिलेने कोणाचेही ऐकले नाही.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या पश्चिम विहार पोलीस स्टेशन परिसरात, कोविड ड्यूटीवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना मास्क शिवाय स्कूटी चालवणाऱ्या महिलेला रोखणे महागात पडलं आहे. स्कूटीवर जाणाऱ्या महिलेने तिला ओळखणाऱ्या महिलेला घटनास्थळी बोलावले, त्यानंतर महिलेने नागरी संरक्षण कर्मचारी आणि त्याच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली आणि शिवीगाळ केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, घटनास्थळी असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनीही त्या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या महिलेने कोणाचेही ऐकले नाही, त्यानंतर पश्चिम विहार पश्चिम पोलीस स्टेशनने नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून भादंवि 186 353 आणि इतर कलमांसह गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात महिला नागरी संरक्षण कर्मचारी आणि सहकाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ करत आहेत.


ग्रेटर नोएडाचा एक व्हिडिओ आज व्हायरल होत आहे. वास्तविक, एका तरुणाला मुलीची छेड काढणं खूपच महागात पडलं. मुलीने मध्यवर्ती चौकावर तरुणाला बेदम मारहाण केली. असे सांगितले जात आहे की, मुलगा दोन दिवसांपासून मुलीला त्रास देत होता. हा हाय व्होल्टेज गोंधळ रस्त्यावर बराच काळ सुरु होता. घटना जेवर थान परिसरातील मुख्य चौकातील आहे. या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तरुणी चौकात तरुणाला मारहाण करत आहे, तर उपस्थित असलेल्या लोकांनी व्हिडिओ बनवला, त्यानंतर तो व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे, ही घटना दिवसाची घडलेली आहे. तरुणी तरुणाला मारहाण करत आहे. आजूबाजूला गाड्या जात आहेत, लोक जात आहेत, परंतु या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप केला नाही, उलट तिथे उपस्थित असलेल्या कोणीतरी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला.
 

काही दिवसांपूर्वी लखनऊ चापट प्रकरणही चर्चेत होते. लखनऊमध्ये कॅब ड्रायव्हरने मारहाण केल्याचा तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सुरुवातीला कॅब चालक दोषी असल्याचे मानले जात होते, पण जेव्हा व्हिडिओ समोर आला, सत्य देखील बाहेर आले. यानंतर पोलिसांनी त्या तरुणीवर गुन्हा दाखल केला. त्या तरुणीला शिक्षा झाली पाहिजे म्हणून अनेकांनी ट्विटरवर ट्वीट पोस्ट केले. 

Web Title: Video goes viral after a woman driving a Scooty without a mask was stopped, abusing and beating civil defense personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.